‘MeToo’ प्रकरणी तनुश्री दत्ताची बाजू मांडणाऱ्या वकिलांवर विनयभंगाचा आरोप, जाणून घ्या…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – MeToo प्रकरणात बॉलीवूडची अभिनेत्री तनुश्री दत्ता हिची बाजू मांडणारे वकील नितिन सातपुते यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. विशेष म्हणजे पीडित महिला देखील वकील असून तिने नितिन सातपुते यांच्यावर विनयभंगाचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी मुंबई येथील खेरवाडी पोलिस स्टेशनमध्ये FIR दाखल करण्यात आली आहे. नितीन सातपुते हे ज्यूनियर डॉक्टर पायल आत्महत्या प्रकरणात पीडित पक्षाचे वकील आहेत. तसेच नितिन सातपुते हे मुंबई हायकोर्टातील एक प्रसिद्ध वकील म्हणून देखील ओळखले जातात.

विशेष म्हणजे पीडित महिला आणि वकील नितिन सातपुते हे दोन्ही एकाच सोसायटीत राहतात. गेल्या वर्षी सप्टेंबर २०१९ मध्ये झालेल्या मीटिंगमध्ये तक्रारदार महिलेने नितिन सातपुते यांच्या निवासस्थानासमोर बनवलेल्या गार्डनवर देखील आक्षेप घेतला होता. यातून त्यांच्यात वाद देखील घडून आला होता. या महिलेने त्यांच्याविरोधात आक्रमक पावित्रा घेत त्यांच्या घरासमोर बनवण्यात आलेले गार्डन काढून टाकण्यात यावे आणि त्याठिकाणी मुलांना खेळायला मैदान करण्यात यावे अशी भूमिका तक्रारदार महिलेने घेतली होती. यावरून नितिन सातपुते नाराज झाले होते. यावरून तक्रारदार महिला आणि नितिन सातपुते यांच्यात बाचाबाची देखील झाली होती. या रोषातूनच नितिन सातपुते यांनी २ नोव्हेंबर २०१९ रोजी लिफ्टमध्ये घुसून पीडित महिलेच्या नातेवाईकांना धमकावले होते. आणि नंतर फोनवरूनही धमकी दिली होती.

‘अश्लिल कृत्य करेल तेव्हा तुला समजेल’

दरम्यान पीडित महिलेने राज्य महिला आयोगाकडे या प्रकरणाची तक्रार दिली आहे. परंतु नितिन सातपुते हे २७ नोव्हेंबरला आयोगासमोर हजर झाले नाही. त्यामुळे नितीन सातपुते यांना ३० डिसेंबर २०१९ रोजी वांद्रे येथे महिला आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. तेव्हा पीडित महिला राज्य महिला आयोगाच्या कार्यालयाबाहेर उभी होती. त्या दरम्यान तेथे नितीन सातपुते आले आणि ते पीडित महिलेच्या कानात म्हणाले की, ‘अश्लिल कृत्य करेल तेव्हा तुला समजेल’. यामुळे महिलेने पोलीस स्टेशनकडे धाव घेतली आणि खेरवाडी पोलीस स्टेशन ला झालेल्या प्रकाराची म्हणजेच विनयभंगाची तक्रार नोंदवली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/