#MeToo: अखेर केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांनी दिला राजीनामा 

नवी दिल्ली: वृत्तसंस्था  – # मी टू मुळे अडचणीत आलेले केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर  यांनी अखेरीस राजीनामा दिल्याची माहिती मिळते आहे. अनेक महिला पत्रकारांनी लैंगिक शोषणाचे आरोप त्यांच्यावर केले आहेत . पत्रकार प्रिया रमानी यांनी सर्वप्रथम अकबर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. तेव्हापासून अकबर यांच्यावर  आतापर्यंत 15 महिला पत्रकारांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. एम. जे. अकबर यांनी रमानी यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. मात्र रमानी यांना 19 महिला पत्रकारांनी पाठिंबा दर्शव अकबर यांच्याविरोधात न्यायालयात साक्ष देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे अकबर यांच्या अडचणीत वाढ झाली होती.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3e2acbe6-d20d-11e8-bcd5-19b4f904d013′]
 दरम्यान, रमानी यांच्या समर्थनार्थ पुढ आलेल्या 19 महिलांनी एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध केलं आहे. रमानी यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्यात आपल्याला साक्ष देण्याची संधी दिली जावी, अशी मागणी त्यांनी यातून केली आहे. ‘रमानी या संघर्षात एकटी नाही. न्यायालयानं मानहानीच्या खटल्यात आमची साक्ष नोंदवावी. आमच्यातील काहीजणी लैंगिक अत्याचाराच्या साक्षीदार आहेत,’ असं त्यांनी निवेदनात म्हटलं आहे. यावर सर्व 19 महिलांची स्वाक्षरी आहे. निवेदनावर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये मीनल बघेल, मनीषा पांडे, तुषिता पटेल, कणिका गहलोत, सुपर्णा शर्मा, रमोला तलवार बादाम, होइहनु होजेल, आएशा खान, कुशलरानी गुलाब, कनीजा गजारी, मालविका बॅनर्जी, ए. टी. जयंती, हामिदा पार्कर, जोनाली बुरागोहेन, मीनाक्षी कुमार, सुजाता दत्ता सचदेवा, रेशमी चक्रवाती, किरण मनराल आणि संजरी चॅटर्जी यांचा समावेश आहे. याशिवाय डेक्कन क्रोनिकलच्या पत्रकार क्रिस्टिना फ्रान्सिस यांनीदेखील या निवेदनावर स्वाक्षरी केली आहे.
 [amazon_link asins=’B072MFVNML,B0756T5K1V’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ce9db5ea-d20d-11e8-a7f4-c387164f7f32′]