Metro AG | भारतातून व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत Metro, अंबानी-दमानी आणि टाटांशी केला संपर्क

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर्मनीची रिटेलर मेट्रो एजी (Metro AG) भारतातून व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत आहे. खरं तर, मेट्रो एजी भारतीय उपकंपनी मेट्रो कॅश अँड कॅरी इंडियामधील आपला हिस्सा विकण्यासाठी भागीदार शोधत आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने एका सूत्राच्या संदर्भाने ही माहिती दिली आहे. (Metro AG)

 

सूत्राने सांगितले की, मेट्रो एजी आता आपल्या भारतीय युनिटच्या प्रगतीचा आढावा घेतल्यानंतर धोरणात्मक बाह्य टाय-अप शोधत आहे. याबाबत काही बँकर्सशी चर्चा झाली आहे. मेट्रो कॅश अँड कॅरी इंडियाचे भारतात 30 पेक्षा जास्त स्टोअर्स आहेत.

 

अंबानी-दमानी-टाटा यांच्याशी संपर्क :
इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, मेट्रो एजीने मुकेश अंबानींच्या (Mukesh Ambani) रिलायन्स रिटेल, राधाकिशन दमानी (Radhakishan Damani) यांच्या एव्हेन्यू सुपरमार्ट (D-Mart) आणि टाटा समूहाशी (Tata Group) भागभांडवल विक्रीसाठी संपर्क साधला आहे. याशिवाय, अमेझॉन, थायलंडचा चारोन पोकफंड (सीपी) समूह, लुलु समूह आणि पीई फंड समारा कॅपिटलसोबत सुद्धा प्रारंभिक टप्प्यातील बोलणी झाली आहेत. (Metro AG)

सूत्रानुसार, भारतीय व्यवसायाला आपले नेटवर्क वाढवण्यासाठी आणि जास्त स्टोअर्स वाढवण्यासाठी जास्त गुंतवणूकीची गरज आहे.
त्याचवेळी मेट्रो एजीच्या प्रवक्त्यानेही कंपनी धोरणात्मक पर्यायांचा आढावा घेत असल्याचे मान्य केले आहे.

 

गेर्ड कोस्लोव्स्की, वरिष्ठ उपाध्यक्ष (कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स), मेट्रो एजी, म्हणाले, मेट्रो इंडिया हा घाऊक विक्रीसाठी प्रचंड क्षमता असलेला वाढता व्यवसाय आहे.
मेट्रोची विद्यमान घाऊक क्षमता वाढवण्यासाठी आणि भारतातील व्यवसाय वाढीला गती देण्यासाठी आम्ही संभाव्य भागीदारांसह पर्यायांचे पुनरावलोकन करत आहोत.

 

Web Title :- Metro AG | metro ag looking for partner to sell stake in cash and carry india interested firm reliance d mart tata group

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

LIC Revise Its Investment Policy | LIC ने स्वत:ला बदलण्याचा बनवला प्लान, आता विचारपूर्वक करणार आपल्या फंडाची गुंतवणूक

 

Sharad Pawar And Brahmin Community | ब्राम्हण समाजासाठी ‘परशुराम महामंडळ’ स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू; शरद पवारांचे आश्‍वासन

 

Modi Government Reduce Central Excise Duty On Petrol And Diesel | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! पेट्रोल 9.5 रूपये तर डिझेल 7 रूपयांनी स्वस्त होणार, जाणून घ्या