‘मेट्रो मॅन’ ई श्रीधरन करणार लवकरच भाजपात प्रवेश

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – मेट्रो मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले केरळमधील ई. श्रीधरन लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. केरळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांच्या नेतृत्वाखाली राज्यात रविवारी (दि. 21) पासून विजय यात्रा काढली जाणार आहे. या विजय यात्रेवेळी ई. श्रीधरन यांचा भाजप प्रवेशाची औपचारिकता पार पाडली जाणार असल्याचे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिले आहे.

ई. श्रीधरन अधिकृतपणे 21 फेब्रुवारीला भाजपचे सदस्यत्व स्वीकारतील. श्रीधरन यांनी मेट्रोच्या कामात मोठे योगदान दिले असून त्यांना पद्मश्री आणि पद्म विभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ई श्रीधरन यांनी कोलकाता ते दिल्ली मेट्रोसाठी मोठ योगदान दिले आहे. विकासकामांमधील योगदानासाठी त्यांना फ्रान्स सरकारनेसुद्धा गौरवले आहे. 2005 मध्ये त्यांना Chavalier de la Legion d’honneur पुरस्काराने सन्मानित केले होते. तसेच अमेरिकेच्या टाइम मॅगझिनने ई श्रीधरन यांना आशियाचा हिरो असेही म्हटले होते.