नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुजरात आणि महाराष्ट्र रेल्वे करीता जागा निघाल्या आहेत. महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन निगम लिमिटेडमध्ये (Mumbai Metro Recruitment 2020) वेगवेगळ्या पदांसाठी 215 जागा भरायच्या आहेत. तर गुजरात मेट्रो रेल्वेने देखील वेगवेगळ्या पदांसाठी 135 जागांकरिता अर्जाची मागणी केली आहे.
Mumbai Metro (MMMOCL) Recruitment 2020
महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (MMMOCL) ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, मुंबई मेट्रोसाठी स्टेशन मॅनेजर, मुख्य वाहतूक नियंत्रक, वरिष्ठ विभाग अभियंता आणि पर्यवेक्षक अशी एकूण 215 पदे भरती करण्यात येणार आहेत.
मुंबई मेट्रो भरती 2020 साठी पात्र उमेदवार रिक्त पदांसाठी 17 एप्रिल 2020 पर्यंत अर्ज करू शकतात. या भरतीनुसार महिलांसाठी राखीव पदे रिक्त राहिल्यास पुरुष उमेदवारांना संधी मिळणार आहे. म्हणजेच, जर महिलांच्या जागा रिक्त असतील तर त्यांच्याजागी पुरुष भरती केले जातील.
या भरती अंतर्गत खालील पदांची भरती करण्यात येणार आहे…
– स्टेशन मास्टर- 06 पदे
– चीफ ट्रॅफिक कंट्रोलर- 04 पदे
– सीनियर सेक्शन इंजीनियर- 25 पदे
– सेक्शन इंजीनियर- 113 पदे
– सीनियर सेक्शन इंजीनियर (सिविल)- 04 पदे
– सेक्शन इंजीनियर- 08 पदे
– सीनियर सेक्शन इंजीनियर (ईएण्डएम)- 02 पदे
– सेक्शन इंजीनियर (ईएण्डएम)- 05 पदे
– सीनियर सेक्शन इंजीनियर (एसएण्डटी)- 18 पदे
– सेक्शन इंजीनियर (एसएण्डटी)- 29 पदे
– सुपरवाइजर (कस्टमर रिलेशन)- 01 पदे
GMRC Recruitment 2020
मुंबई मेट्रोव्यतिरिक्त गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (GMRC) देखील 135 पदांसाठी अर्ज मागविले आहेत. या रिक्त पदासाठी थेट भरती केली जाईल. परंतु जीएमआरसीने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये ही भरती कराराच्या आधारे होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
बीई किंवा बीटेक पदवी असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतील. या भरतीसाठी उमेदवार 3 एप्रिल 2020 पर्यंत अर्ज करू शकतात.
भरतीसाठी वयोमर्यादा 28 ते 55 वर्षे आहे. निवडलेल्या उमेदवारांचे पगार दरमहा 33,000 ते 2,80,000 पर्यंत असतील. सर्व वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या पगाराची रक्कम निश्चित केली गेली आहे.