ड्रग्जची तस्करी करणार्‍यांना पकडण्यासाठी गेले 19 पोलिस अधिकारी – कर्मचारी, गुन्हेगारांनी ट्रकमध्येच सर्वांना जिवंत जाळलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मेक्सिकोमध्ये ड्रग्स तस्करांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच उलट हल्ला करण्यात आला. तस्कर अगोदरच हल्ल्याच्या तयारीने लपून बसले होते. पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला करत दोन्ही बाजूने जोरदार गोळीबार करत तस्करांनी पोलिसांची गाडी देखील पेटवून दिली. यामध्ये १९ पोलिसांचा जिवंत जळून मृत्यू झाला आहे.

नवीन नाही पोलीस आणि तस्करांमधील लढाई
मेक्सिकोमध्ये पोलीस आणि तस्करांमध्ये दररोजच लढाई होत असते. मात्र मागील काही दिवसांपासून यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन आदेश लागू करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या एका तुकडीवर घरात लपून बसलेल्या तस्करांनी बेछूट गोळीबार केला.

हल्लेखोरांचा तपास सुरु
गव्हर्नर सिल्वानो औरेयोल्स यांनी या घटनेवर दुःख व्यक्त करत या हल्ल्याला भ्याड हल्ला म्हटले. तसेच पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडण्यात येणार नाही. या हल्ल्याच्या तपासाचे आदेश देण्यात आले असून हल्लेखोरांचा शोध देखील घेतला जात आहे.

हल्लेखोरांनी सोडला पुरावा
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मोठ्या प्रमाणात हत्यारे जवळ असलेल्या तस्करांनी पोलिसांच्या गाडीला घेराव घालून बेछूटगोळीबार करत त्या वाहनाला आग लावून दिली. त्यामुळे पोलिसांचा जळून मृत्यू झाला. त्याचबरोबर त्या ठिकाणी पोलिसांना एक चिट्ठी आढळून आली असून हा हल्ला सीजेएनजी या संघटनेच्या हल्लेखोरांनी केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी