MGM मध्ये विद्यार्थिनीसमोर अश्लील चाळे, तरुण ‘गोत्यात’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – कामोठे येथील एमजीएम इंजिनीअरिंग कॉलेजमधील विद्यार्थिनीकडे पाहून हस्तमैथुन करणाऱ्या विनोद फड (३०) या तरुणाला न्यायालयाने येत्या २७ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.

पीडित मुलगी कॉलेज बाहेरील झेरॉक्स सेंटरवर उभी असताना फड याने तिच्या मागे उभे राहून हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली. काही वेळानंतर त्या विद्यार्थिनीच्या सदर प्रकार लक्षात आल्यानंतर तिने आरडाओरड केली. त्यानंतर या ठिकाणी उभ्या असलेल्या इतर विद्यार्थ्यांनी आरोपी विनोद फड याला चोप देऊन महाविद्यालयातील प्राचार्यांना या प्रकाराची माहिती दिली.

मात्र प्राचार्यांनी विद्यार्थ्यांच्या गोंधळाकडे दुर्लक्ष करून आपला नियोजित कार्यक्रम सुरूच ठेवला. अखेर विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढल्यानंतर प्राचार्यांनी कामोठे पोलिसांना पाचारण करून आरोपी विनोद फड याला पोलिसांच्या स्वाधीन केले. विद्यार्थ्यांनी फड याच्यावर गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर रात्री उशिरा पोलिसांनी आरोपी विनोद फड याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याची २७ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली.

प्राध्यापकांवर गंभीर आरोप करत विद्यार्थ्यांचे आंदोलन

कामोठे येथील इंजिनीअरिंग कॉलेजातील विद्यार्थिनीसोबत घडलेल्या प्रकारानंतर विद्यार्थ्यांनी शुक्रवारी देखील आंदोलन करून काही प्राध्यापकांकडून विद्यार्थिनींचा लैंगिक छळ होत असल्याचा आरोप करत घोषणाबाजी केली. तसेच प्राचार्य व प्राध्यापकांवर कारवाईची मागणी लावून धरली.
अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कॉलेजात धाव घेऊन विद्यार्थ्यांची समजूत काढली. अखेर कॉलेज प्रशासनाकडून प्राचार्यांना बडतर्फ करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन थांबवले.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like