चित्रपटगृह आणि स्विमिंग पूल ‘जादा’ क्षमतेसह उघडणार, गृह मंत्रालयाच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  –  केंद्रीय गृह मंत्रालयाने विविध व्यवहार सुरळीत करण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार, आता चित्रपटगृह जास्त क्षमतेसह उघडू शकतात. यासोबतच स्विमिंग पूल सर्वांसाठी उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे.

गृह मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना निर्देश दिले आहेत की, देखरेख, कंटेन्मेंट आणि सावधगिरीसाठी जारी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. या मार्गदर्शक सूचना 1 फेब्रुवारीपासून 28 फेब्रुवारीपर्यंत जारी राहतील.

 

सोबतच, सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये कंटेन्मेंट झोनच्या बाहेर सर्व व्यवहारांना परवानगी राहील. सामाजिक, धार्मिक, खेळ, मनोरंजन, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना राज्यांच्या एसओपीच्या अंतर्गत परवानगी दिली जाईल.

राज्यांतर्गत आणि राज्यातून दुसर्‍या राज्यापर्यंत प्रवास किंवा माल वाहतुकीवर कोणतेही प्रतिबंध असणार नाहीत. यासाठी कोणत्याही वेगळ्या परवानगीची आवश्यकता असणार नाही. मार्गदर्शक सूचनांमध्ये आरोग्य सेतु अ‍ॅपच्या वापरावर भर देण्यात आला आहे.