म्हाडाच्या सर्वात महागड्या घराची किंमत साडेपाच कोटींवर ?

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन – म्हाडाची घरं म्हणजे स्वस्त घरं, हे समीकरण आता तितकंसं जुळत नाही, याची कल्पना गेल्या काही सोडतींमधून आली आहेच. यंदाच्या १३८४ घरांच्या लॉटरीत म्हाडाने किंमतीचं नवं धोरण ठरवून, परवडणाऱ्या किंमतीतील अधिक घरं देण्याचा प्रयत्न केला असला, तरी सर्वात महागड्या फ्लॅटची किंमत आपल्याला ‘फ्लॅट’ करणारीच आहे.  म्हाडाने नुकताच एक विक्रम मोडीत काढला आहे. म्हाडाच्या एका घराची किंमत 5 कोटी 80 लाखांवर आहे त्यामुळे म्हाडाने यंदा सर्वाधिक किंमतीच्या सदनिकांचा विक्रम मोडीत काढला आहे. मुंबईतील ग्रँट रोडमध्ये म्हाडाच्या एका घराची किंमत सर्वांत जास्त म्हणजेच 5 कोटी 80 लाखांवर आहे. याउलट, म्हाडा लॉटरीतील सर्वात कमी किंमतीची सदनिका चांदिवली, पवई येथे आहे. तिची किंमत १४ लाख ६१ हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे.

महत्त्वाची बाब अशी की, म्हाडाच्या घरासाठी येत्या 5 नोव्हेंबरला जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. याशिवाय  16 डिसेंबरला लॉटरी जाहीर होणार आहे. आज पत्रकार परिषद घेत म्हाडाच्या वतीनं ही माहिती देण्यात आली आहे.

मुंबईत म्हाडाच्या 1384 घरांसाठी 5 नोव्हेंबर पासून अर्ज भरता येणार आहेत. 10 डिसेंबर अर्ज भरण्याची अंतिम तारीख असेल. तर 16 डिसेंबर रोजी 1384 घरांसाठी सोडत निघणार आहे.

उत्पन्न गटानुसार वर्गीकरण (मासिक)

अत्यल्प उत्पन्न गटः २५ हजार रुपयांपर्यंत

अल्प उत्पन्न गटः २५,००१ रुपये ते ५०,००० रुपये
मध्यम उत्पन्न गटः ५०,००१ रुपये ते ७५,००० रुपये
उच्च उत्पन्न गटः ७५,००१ रुपये व त्यापेक्षा अधिक

उत्पन्न गटनिहाय उपलब्ध सदनिका

अत्यल्प उत्पन्न गटः ६३ सदनिका

अल्प उत्पन्न गटः ९२६ सदनिका
मध्यम उत्पन्न गटः २०१ सदनिका
उच्च उत्पन्न गटः १९४ सदनिका

सदनिकांची विक्री किंमत

अत्यल्प उत्पन्न गटः २० लाख रु. वा त्यापेक्षा कमी

अल्प उत्पन्न गटः २० लाख ते ३५ लाख रुपयांपर्यंत
मध्यम उत्पन्न गटः ३५ लाख ते ६० लाख रुपयांपर्यंत
उच्च उत्पन्न गटः ६० लाख व त्याहून अधिक

एकूण सदनिका-1384

कुठे किती घरं ?

अँटॉप हिल वडाळा 278

प्रतीक्षा नगर,सायन 89
गव्हाण पाडा, मुलुंड 269
पी एम जी पी मानखुर्द 316
सिद्धार्थ नगर गोरेगाव(पश्चिम) 24
महावीरनगर,कांदिवली(पश्चिम) 170
तुंगा,पवई 101

मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळा मार्फत प्राप्त सदनिका(मुंबई शहर) 50

विकास नियंत्रण विनियम 33(5)अंतर्गत प्राप्त सदनिका 19
विखुरलेल्या सदनिका 68

म्हाडाच्या सोडतीचं वेळापत्रक
५ नोव्हेंबर २०१८ – जाहिरात प्रसिद्धी आणि ऑनलाइन अर्जासाठी नोंदणी सुरुवात
१० डिसेंबर २०१८ – अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख
१६ डिसेंबर २०१८ – सोडतीचा दिनांक
जाहिरात