Mhada Exams Paper Leak | पुणे सायबर पोलिसांची मोठी कारवाई ! ‘म्हाडा’चा पेपर फोडणार्‍या तिघांना अटक, परिक्षा पुढे ढकलली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Mhada Exams Paper Leak | आरोग्य विभागाचा (Maharashtra Health Department) पेपर फोडणार्‍यांवर कारवाई केल्यानंतर आता पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) म्हाडाच्या पूर्व परिक्षेचा पेपर फोडणार्‍यांवर (Mhada Exams Paper Leak) कारवाई केली आहे. सायबर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यामुळे परिक्षा रद्द करण्यात येत असल्याचे गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी Twitter वर रात्री उशिरा जाहीर केले आहे.

 

 

प्रितेश देशमुख Pritesh Deshmukh (रा. पुणे), संतोष  हरकळे (Santosh Harkle) आणि अंकुश हरकळे Ankush Harkle (रा. बुलढाणा – Buldhana) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. प्रितेश देशमुख हा कंत्राटदार असून संतोष व अंकुश हे त्याचे मित्र आहेत. देशमुख याने आपल्या मित्रांच्या मदतीने म्हाडाचा पूर्वपरिक्षेचा पेपर फोडल्याचे सायबर पोलिसांना आढळून आल्याने त्यांनी रात्री उशिरा तिघांना अटक केली आहे. (Pune Police Cyber Cell Arrest Three In Mhada Exams Paper Leak Case)

 

म्हाडाची (Mhada) पूर्व परिक्षा आज होणार होती. तसेच वेगवेगळ्या पदासाठी या आठवडा भर परिक्षा घेण्यात येणार होती. या सर्व परिक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. या परिक्षा जानेवारीत घेण्यात येणार आहे.

 

 

जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, सर्व विद्यार्थ्यांची क्षमा मागून सांगतो की,
उद्याची होणारी परिक्षा व या आठवड्यात होणार्‍या सर्व परिक्षा (Mhada Exams)
काही अपरिहार्य कारणावरुन व तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
ही माहिती मी इतक्या रात्री देत आहे कारण की विद्यार्थ्यांनी उद्या सकाळी परिक्षा केंद्रावर जाऊ नये. त्यांनी घरीच थांबावे.

 

Web Title :-  Minister Jitendra Awhad Said mhada exams postponed todays exam canceled pune police cyber cell arrested three persons in Mhada Exams Paper Leak Case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा