Mhada Lottery 2023 | आता म्हाडाचे घर घेणं झालं सोप्प! २१ नाही तर लागणार फक्त एवढीचं कागदपत्रे…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – तुमच्या स्वप्नातील घर घेणे आता सोपे झाले आहे. तसेच तुमचे घराचे स्वप्न आता सत्यात उतरवण्याची वेळ आली आहे. म्हाडाकडून (Mhada Lottery 2023) मुंबई आणि पुण्यात घरांसाठी लॉटरी काढण्यात आली आहे. मुंबईतील म्हाडाच्या (Mhada Lottery 2023) घरांसाठी आजपासून रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे. याविषयी तुम्ही म्हाडाच्या अधिकृत mhada.gov.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करू शकता.

तसेच घर खरेदीदारांसाठी म्हाडाकडून एक आनंदाची बातमी जाहीर करण्यात आली आहे. याअगोदर म्हाडाच्या लॉटरीत सहभागी होण्यासाठी एकूण २१ कागदपत्रे जमा करावी लागायची. याशिवाय ही प्रक्रिया देखील खूप किचकट होती. त्यामुळे घर खरेदीदारांना अनेक अडचणी यायच्या. त्यामुळे आता काही कागदपत्रे कमी केल्याची माहिती म्हाडाने दिली आहे. तेव्हा आता पूर्वीप्रमाणे लॉटरीत सहभागी होण्यासाठी २१ कागदपत्रांची आवश्यकता लागणार नसून आता केवळ ७ चं कागदपत्रे खरेदीदारांना सादर करावी लागणार आहेत.

म्हाडा लवकरच मुंबईत ४ हजार घरांसाठी लॉटरी काढणार आहे.
त्यात अर्जदारांना केवळ ७ कागदपत्रे देऊन सहभागी होता येणार आहे. यासंबंधीच्या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, प्रतिज्ञापत्र, जात प्रमाणपत्र आणि त्या प्रवर्गाचा दाखला यांचा समावेश आहे. अगोदर कागदपत्रे जास्त असल्यामुळे त्यांची पडताळणी करण्यासाठी देखील वेळ लागायचा. त्यामुळे इतर प्रक्रियेला उशीर व्हायचा. आता कागदपत्रे कमी केल्याने लॉटरीची प्रक्रिया जलदगतीने पुढे जाईल.

कागदपत्राचे काम कमी करून प्राधिकरणाने आपले कामही थोडे हलके केले आहे. २०२३ सालातील म्हाडाची
(Mhada Lottery 2023) लॉटरी ही यापूर्वी जाहीर केलेल्या सर्व लॉटरींपेक्षा वेगळी असणार आहे.
आता एकदा रजिस्ट्रेशन केले की त्यावरून तुम्हाला परत फॉर्म भरता येणार आहे.
त्यामुळे परत रजिस्ट्रेशन करण्याची चिंता आता मिटली आहे.

जर म्हाडाच्या (Mhada Lottery 2023) लॉटरीत तुम्हाला याआधी घर लागलं असेल तर तुमचे नाव ड्रॉप
करण्यात येणार आहे. मात्र जर तुम्हाला आधीच्या लॉटरीत घर लागलं नसेल तर तुम्ही या लॉटरीत पुन्हा घर
खरेदीसाठी पात्र असणार आहात.

Web Title :- Mhada Lottery 2023 | mhada lottery 2023 mumbai where to register mhada gov in and which document require

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nandurbar Police | नंदुरबार पोलिसांचा मध्य प्रदेशातील चंदनाच्या कारखान्यांवर छापा; 15 लाखांचे चंदनाचे तेल व लाकुड हस्तगत, राज्यात प्रथमच चंदन तस्करीच्या मुळापर्यंत पोहचले पोलीस

Nitesh Rane | ‘लघूशंकेनी धरणाची उंची वाढवणाऱ्यांनी…’, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर नितेश राणेचा प्रहार