म्हाडाचे 7500 जणांचे घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण – जितेंद्र आव्हाड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे गृह निर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड हे म्हाडा पत्रकार संघाच्या आठव्या वर्धापनदिन निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला म्हाडा मुख्यालयात उपस्थित होते. तेव्हा त्यांनी एक मुंबईतील लोकांसाठी एक खुशखबर दिली आहे. लवकरच आता म्हाडाच्या योजनेची ७ हजार ५०० जणांचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरांच्या सोडतीसह मुंबई मंडळाच्या सोडतीची तयारी सुरू आहे अशी माहिती गृह निर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

दरम्यान, म्हाडाकडे जमीन नाही. विकासकांसोबत संयुक्त भागीदार करून घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितलं आहे. पुढे ते म्हणाले, जमीन अधिग्रहण आणि गृहसाठा यावर लक्ष्य केंद्रित केले जाणार आहे. भागीदारीत गृहसाठा आणि भूखंड अधिग्रहणातून घरे उपलब्ध केली जातील. म्हाडातील कार्यप्रणाली सुलभ करण्याच्या प्रयत्नास यश आलेले नाही, ही खंतदेखील जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे.

तसेच या सोडतीतील घरं ही ठाणे, कल्याण आणि नवी मुंबईतील आहेत. कोकण मंडळाची सोडत ही लॉकडाऊनमुळे थोडी लांबणीवर गेली होती. परंतु आता तयारी सुरू झाली आहे. तसेच कोकण बोर्डाचे मुख्याधिकारी नितीन महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार की, सध्या घरांची जेवढी संख्या सांगितली आहे. त्याहून अधिक वाढण्याची शक्यता आहे. मे महिन्यात याची लॉटरी काढली जाईल आणि विजेत्यांचं घर घेण्याचं स्वप्नही पूर्ण होईल असे त्यांनी सांगितले.