मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – म्हाडा सोडतीसाठीच्या नोंदणीस (MHADA Lottery Registration) गुरुवारपासून सुरुवात करण्यात येणार आहे. पुणे मंडळाच्या आगरकर नगर येथील म्हाडा भवनात (Mhada Bhavan Pune) दुपारी बारा वाजता मुख्य अधिकारी नितीन माने-पाटील (Nitin Mane Patil) यांच्या हस्ते नोंदणी प्रक्रियेला (MHADA Lottery Registration) सुरुवात केली जाणार आहे. त्याचवेळी पुणे मंडळाच्या 5,966 घरांच्या सोडतीच्या प्रक्रियेलाही सुरुवात केली जाणार आहे.
गेल्या वर्षभरात म्हाडाच्या मुंबई, कोकण, पुणे आणि औरंगाबाद मंडळाच्या घरांच्या सोडतीची नागरिकांना प्रतिक्षा होती. परंतु म्हाडा सोडत प्रक्रियेत बदल करण्यात आल्याने आणि त्याअनुषंगाने नवीन संगणकीय प्रणाली तयार करण्यात येत असल्याने ही सोडत रखडली होती. परंतु आता नवीन संगणकीय प्रणालीची चाचणी यशस्वी झाली असून नवीन प्रक्रियेला मंजूरी मिळाल्याने गुरुवारपासून (दि.5) एकच नोंदणी सेवा सुरु होत आहे. तर पुणे मंडळाच्या सोडतीला देखील गुरुवापासून सुरुवात होणार आहे.
ही नोंदणी प्रक्रिया कायमस्वरुपी असल्याने नागरिकांना कधीही नोंदणी करता येणार आहे.
त्यामुळे मंडळाच्या घराच्या सोडती एकामागोमाग एक मार्गी लावल्या जाणार आहेत.
पुणे मंडळाच्या सोडतीसाठीच्या नोंदणीला आणि अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला गुरुवार पासून सुरुवात होणार आहे.
असे असले तरी नोंदणी प्रक्रिया ही सर्वांसाठी असणार आहे.
भविष्यात मुंबई, कोकण, नाशिक किंवा इतर कोणत्याही मंडळांच्या सोडतीसाठी इच्छुकांना नोंदणी करता येणार आहे.
त्यामुळे आता आवश्यक असणारी कागदपत्रे जमा करुन नोंदणी करावी, असे आवाहन म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
Web Title :- MHADA Lottery Registration | registration of mhada lottery starts from today mumbai
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Ajit Pawar on Nitesh Rane | टिल्ल्या लोकांनी मला शिकवू नये; अजित पवारांचा नितेश राणेंवर निशाणा
IPS Deven Bharti | वरीष्ठ आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची बृहन्मुंबईच्या विशेष आयुक्तपदी नियुक्ती