MHADA | म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी आजपासून ऑनलाइन अर्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – MHADA | पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळ (MHADA) अंतर्गत म्हाडाच्या विविध योजनेतील घरांच्या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आज (मंगळवार) पासून सुरु होतेय. आजपासून तुम्हाला म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार आहे. तर, ऑनलाईन अर्ज नोंदणीचा प्रारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते आज (मंगळवारी) करण्यात येत आहे.

म्हाडाच्या (MHADA) पुणे मंडळामार्फत विविध योजनेतील 4 हजार 222 नवीन घरांच्या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीचा प्रारंभ अजित पवार यांच्या हस्ते 29 ऑक्टोबर रोजी होणारा कार्यक्रम काही तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आला होता. या पार्श्वभुमीवर आता मुंबई येथील मंत्रालयातील अजित पवार (Ajit Pawar) यांच्या दालनात आज दुपारी 2.45 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील (Satej Patil), म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर (Anil Diggikar), प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर (Milind Mhaskar) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

दरम्यान, म्हाडाच्या विविध योजनतील दोन हजार 823 सदनिका आणि 20 टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत 1
हजार 399 सदनिका अशा एकूण 4 हजार 222 नवीन सदनिकांच्या सोडतीसाठी ऑनलाईन नोंदणीचे अर्ज सुरू होत आहे.

हे देखील वाचा

Chitra Wagh Letter To Ajit Pawar | राष्ट्रवादीला ‘सोडचिठ्ठी’ देऊन भाजपात गेलेल्या चित्रा वाघ यांचं अजित पवारांना पत्र, म्हणाल्या…

Hardik Pandya Watch | हार्दिक पांड्याकडून 5 कोटींची घड्याळं जप्त, मुंबई कस्टम विभागाकडून कारवाई

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : MHADA | online application registration for lottery of mhada from today pune news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update