
MHADA Paper Leak Case | म्हाडा परीक्षा पेपरफुटी प्रकरणात पुणे सायबर पोलिसांकडून आणखी एकाला अटक
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – MHADA Paper Leak Case | म्हाडा भरती परीक्षा (MHADA Recruitment Exam) दरम्यान पेपरफुटी प्रकरणाचा पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) पर्दाफाश केला आहे. काही दिवसांपूर्वी जी.ए.सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रा. लि. (GA Software Technology Pvt. Ltd.) कंपनीचा संचालक डॉ. प्रितिश देशमुख (Director Dr. Pritish Deshmukh) याच्यासह अंकुश हरकळ (Ankush Harkal), संतोष हरकळ (Santosh Harkal) या एजंट बंधूंना अटक (Arrest) केली होती. म्हाडा पेपर फुटीप्रकरणात (MHADA Paper Leak Case) पुणे सायबर पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे. त्यामुळे अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या 11 झाली आहे. (Pune Cyber Crime)
म्हाडा पेपरफुटी प्रकरणाचा (MHADA Paper Leak Case) पोलिसांनी सखोल तपास करत एजंट कांचन श्रीमंत साळवे Kanchan Shrimant Salve (वय-31 रा. नागसेन नगर, धानोरा रोड, बीड) याला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात आतापर्य़ंत 11 आरोपींना अटक केली आहे. आरोपी साळवे याला न्यायालयात (Pune Shivaji Nagar Court) हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
जी.ए. सॉफ्टवेअरचा डॉ. प्रितिश देशमुख याने म्हाडाचा पेपर फोडण्यासाठी जवळपास 10 एजंटांशी (Agent) संपर्क केला होता. त्यांच्यामार्फत पेपर फोडण्याचा कट असल्याचे तपासात समोर आले आहे. या एजंटांनी परीक्षार्थींशी संपर्क साधून त्यांना पेपर कोरा सोडण्यास सांगितले होते. त्यानंतर ओएमआर शीटमध्ये (OMR Sheet) देशमुख फेरफार करुन परीक्षार्थींना पास करणार होता. परंतु पोलिसांनी त्याचा कट हाणून पाडला. पोलिसानी त्यांचे 4 पेन ड्राईव्ह, टॅब, मोबाईल जप्त केले आहेत.
Web Title : MHADA Paper Leak Case | mhada paper leak case one arrested pune cyber police
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर
लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त