MHADA Pune Lottery 2022 | पुणेकरांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार ! म्हाडा लवकरच तब्बल 4 हजार 744 घरांची सोडत काढणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – MHADA Pune Lottery 2022 | पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा Maharashtra Housing And Area Development Authority (MHADA) आता तब्बल 4 हजार 744 घरांची सोडत काढणार आहे. त्यामुळे पुणे शहरातील लाभार्थ्यांना त्यांचं हक्काच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे. याबाबत एक अधिकृत जाहीरात देखील जारी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

 

महाराष्ट्रातील रहिवाशांना राज्यात परवडणारी घरे खरेदी करण्याची संधी देण्याचं काम महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजे म्हाडा करते. त्यामुळे येत्या काही दिवसातून म्हाडा तब्बल 4 हजार 744 घरांची सोडत काढणार आहे. (MHADA Pune Lottery 2022)

 

‘या’ भागात म्हाडा सोडत काढणार –

कसबा पेठ (Kasba Peth)
महंमदवाडी (Mohammadwadi)
केशवनगर (Keshav Nagar)
मुंढवा (Mundhwa)
बाणेर (Baner)
वाघोली (Wagholi)
फुरसुंगी (Fursungi)
लोहगाव (Lohgaon)
पाषाण खराडी (Pashan kharadi)
वाकड (Wakad)
थेरगाव (Thergaon)
वडमुखवाडी (Wadmukhwadi)
ताथवडे (Tathawade)
किवळे (Kiwale)
चऱ्होली (Charholi)
बोऱ्हाडे वाडी (Borhadewadi)
चिखली (Chikhali)
पुनावळे (Punawale)

 

Web Title :- MHADA Pune Lottery 2022 | Maharashtra Housing And Area Development Authority mhada will open applications for 4744 houses soon in pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा