म्हाळसा’ ला मिळाला खऱ्याखुऱ्या आयुष्यातला ‘मल्हार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

‘जय मल्हार ‘ या लोकप्रिय मालिकेतील म्हाळसाची भूमिका करणाऱ्या सुरभी हांडे हिने गुपचूप साखरपुडा केला आहे. खऱ्या खुऱ्या आयुष्यातील मल्हार तिला मिळाला आहे. जळगाव येथे दुर्गेश कुलकर्णी याच्यासोबत सुरभीने साखरपुडा केला आहे.

[amazon_link asins=’B07G556924′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8bd28e99-a9ef-11e8-bd20-2174c8fcdd76′]

जळगावात पार पडलेल्या सुरभी आणि दुर्गेश त्यांच्या साखरपुड्याला अगदी जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार उपस्थित होते . सुरभीने या साखरपुड्याची माहिती कुणाला दिली नव्हती . त्यामुळे अगदी साधेपणाने हा सोहळा पार पडला . सध्या सुरभीच्या साखरपुड्याची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. सुरभीच्या साखरपुड्याचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर झाले आहेत.

सुरभीची ‘जय मल्हार’ ही मालिका अतिशय लोकप्रिय झाली. सुरभीने यामध्ये म्हाळसा भूमिका साकारली होती. सुरभी हांडे ही मुळ जळगावची. बालपणापासूनच एकांकिका, नाट्यछटा, एकपात्री प्रयोग साकारण्याचा तिला छंद होता. कुटुंबात वडील संजय हांडे हे आकाशवाणीला अस‌िस्टंट म्युझ‌िक डायरेक्टर म्हणून, तर आई अंजली एम. जे. कॉलेजला संगीत विषयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. सुरभीने ‘स्टॅण्ड बाय’ या हिंदी चित्रपटात आणि ‘आंबट गोड’ या मालिकेत तिने श्रध्दा हे निगेटिव्ह कॅरेक्टर साकारले होते. तसंच केदार शिंदे दिग्दर्शित अगंबाई अरेच्चा २ या सिनेमातसुध्दा ती मह्त्त्वपूर्ण व्यक्तिरेखेत झळकली होती. सध्या सुरभीची लक्ष्मी सदैव मंगलम ही मालिका प्रचंड लोकप्रिय होत आहे.