म्हसळा (रायगड) : दोन एसटी बसना भीषण अपघात; ३ प्रवासी गंभीर

म्हसळा (रायगड) : वृत्तसंस्था
रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील खरसई गावाजवळ एका अवघड वळणावर दोन एसटी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकूण आठ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये चालकासह तीन प्रवासी गंभीर आहेत. या अपघातातील जखमींना उपचारासाठी मुंबईतील सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात भरती केले आहे. नालासोपारा-श्रीवर्धन आणि श्रीवर्धन-नालासोपारा या दोन बसेसमध्ये हा भीषण अपघात झाला. टक्कर झाल्यानंतर दोन्ही बस एकमेकींमध्ये अडकल्या. यावरूनच या अपघाताची तीव्रता लक्षात येते.