MHD Admit Card 2021 | महाराष्ट्र आरोग्य विभाग भरतीसाठी प्रवेशपत्र जारी; असं करा डाउनलोड प्रवेशपत्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  MHD Admit Card 2021 | महाराष्ट्र आरोग्य विभागामध्ये जवळजवळ 3466 जागांसाठी होणाऱ्या मेगाभरतीसाठी प्रवेशपत्र (MHD Admit Card 2021) जारी करण्यात आले आहेत. ग्रुप C, ग्रुप D या पदांच्या परीक्षेसाठीचे हे प्रवेशपत्र जारी केले आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागात (Maharashtra Health department recruitment 2021) (ग्रुप C, ग्रुप D) एकूण 3466 जागाच्या भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले होते. 22 ऑगस्ट 2021 या तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी उमेदवारांना देण्यात आली होती. त्यानुसार प्रवेशपत्रं जारी झालं आहे. उमेदवारांना आपले प्रवेशपत्रं महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या https://groupc.arogyabharti2021.in/ या अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करता येणार आहे.

कसं कराल प्रवेशपत्र डाउनलोड?

– सुरुवातीला ग्रुप C किंवा ग्रुप D LOG IN च्या लिंकवर क्लिक करा.

– यानंतर तुमचा अप्लिकेशन नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा एंटर करा.

– यानंतर तुम्हाला प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचं ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.

– परीक्षेसाठी आपलं प्रवेशपत्र डाउनलोड करून ठेवा.

या तारखेस होणार परीक्षा –

ग्रुप C आणि ग्रुप D च्या जागांसाठी परीक्षा 25 आणि 26 सप्टेंबर 2021 रोजी घेण्यात येणार आहे. त्यासाठी प्रवेशपत्र असणं आवश्यक आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

Group C परीक्षेचं प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी –

https://groupc.arogyabharti2021.in/login/index/MTAwMQ%3d%3d

Group D परीक्षेचं प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी –

https://groupd.arogyabharti2021.in/login/index/MTAwMQ%3d%3d

 

Web Title : MHD Admit Card 2021 | maharashtra health department recruitment 2021 exam admit card released know how to download

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Amenity Space | ऍमेनिटी स्पेस भाड्याने देण्याच्या प्रस्तावावरून भाजपचा ‘यु टर्न’ ! महापौर मोहोळ यांची विषयात पहिल्यांदाच ‘एन्ट्री’

Raosaheb Danve | मुंबईत लोकल ट्रेन सर्वांसाठी कधी सुरू होणार?, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे म्हणाले…

GMC Solapur Recruitment 2021 | सोलापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती; थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड