MHT CET 2018 चा निकाल जाहीर

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या MHT CET परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. पीसीबी (फिजिक्स ,केमिस्ट्री ,बायोलॉजी) गटात अभिजित कदम याने 200 पैकी 188 गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर पीसीएम (फिजिक्स ,केमिस्ट्री,मॅथेमॅटीक्स) गटात 200 पैकी 195 गुण मिळवत आदित्य अभंग याने बाजी मारली आहे.

राज्यात पीसीबी गटात जान्हवी मोकाशी हिने 200 पैकी 183 गुण मिळवत मुलींमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. तसेच पीसीएम गटात मोना गांधी हीने 200 पैकी 189 गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला आहे. या परीक्षेचा निकाल विद्यार्थाना 3 जून रोजी त्यांच्या लॉग इनमध्ये पाहता येणार आहे.

असा पहा तुमचा निकाल 
http://dtemaharashtra.gov.in या वेबसाईटवर विद्यार्थ्यांनी लॉग इन करावे.

लॉग इन केल्यानंतर जन्म दिनांक किंवा अर्ज क्रमांक अशी मागितलेली माहिती टाकल्यानंतर तुमचा निकाल पहायला मिळेल.