MHT-CET Result 2023 | येत्या जून महिन्यात होणार MHT-CET चा निकाल जाहीर; रिजल्ट पाहण्यासाठी या स्टेप करा फॉलो

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – MHT-CET Result 2023 | राज्यातील अभियांत्रिकी (Engineering), औषधनिर्माणशास्त्र (Pharmacology) आणि कृषी पदवी (Agriculture Degree) अभ्यासक्रमासाठी आधी एमएचटी-सीईटी परीक्षा पास होणे गरजेचे असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी महत्त्वपूर्ण असलेली राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे State Common Entrance Test Cell, Maharashtra State (CET Cell) घेण्यात आलेली एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल (MHT-CET Result 2023) पुढील महिन्यात १२ जूनला जाहीर होण्याची शक्यता आहे.

या महिन्यात 9 ते 21 मे या कालावधीत एमएचटी सीईटी ही प्रवेश परीक्षा घेण्यात आली. या वर्षी राज्यातील एकूण 6 लाख 36 हजार 89 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. मात्र यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा कमी होती. अनेक विद्यार्थ्यांनी पीसीबी (PCB) गट अर्थात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या गटाने परीक्षेला दांडी मारली.

 

नुकताच राज्य मंडळातर्फे बारावी बोर्डाचा निकाल (12th Board Result) जाहीर करण्यात आला. त्यामुळे सर्वत्र आता व्यावसायिक (Professional) व बिगरव्यावसायिक (Non-Professional) पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांचे लक्ष सीईटीच्या निकालाकडे लागले आहे. सीईटी सेलने नुकतीच सीईटी परीक्षेची उत्तरतालिका (MHT-CET Answer Table 2023) प्रसिद्ध केली. या उत्तरतालिकेवरील विद्यार्थ्यांच्या हरकती आणि आक्षेपांची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर 12 जूनला निकाल जाहीर करण्यात येईल. विद्यार्थी त्यांचा रोल नंबर वापरून cetcell.mahacet.org / यावर निकाल तपासू शकतात. अशी माहिती सीईटी सेलतर्फे देण्यात आली आहे.

बारावी विज्ञान शाखा (Science Branch) उत्तीर्ण झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील अभियांत्रिकी
तसेच औषध निर्माण क्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्याचा आहे त्यांना ही एमएचटी सी.इ.टी परीक्षा
देणे गरजेचे असते. यासाठीचा अभ्यासक्रम हा बारावी विज्ञान शाखेच्या अभ्यासक्रमासारखाच असतो.
अभियांत्रिकी शाखेमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry) व
गणित (Mathematics) हा पेपर द्यावा लागतो. वैद्यकीय शाखेमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र
(Economics), रसायनशास्त्र (Chemistry) व जीवशास्त्र (Biology) हा पेपर द्यावा लागतो.

– MHT CET निकाल 2023 चा निकाल कसा बघाल ?

१. cetcell.mahacet.org वर जा.

२. त्यामध्ये, MHT CET-2023 टॅबवर जा.

३. निकालाची लिंक शोधा आणि उघडा.

४. विचारलेले तपशील त्यामध्ये टाका व लॉग इन करा.

५. महाराष्ट्र सीईटी निकाल पहा आणि डाउनलोड करा.

Web Title :   MHT-CET Result 2023 | The result of MHT-CET will be announced in the month of June; Follow these steps to see the result

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Navneet Rana | ‘ही उद्धवसाहेबांची देण’, न्यायालयातील सुनावणीनंतर नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Devendra Fadnavis | राज ठाकरेंच्या भेटीबाबत देवेंद्र फडणवीसांचा खुलासा, म्हणाले-‘…म्हणून शिवतीर्थावर गेलो होतो’ (व्हिडिओ)

Pune Police News | मुंढवा पोलिस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक जागेवर नसल्याने सावळा गोंधळ? एसीपी व्हिजीटला देखील अनुउपस्थिती, पुणे पोलिस दलात चर्चेला उधाण