Coronavirus Impact : MHTCET 2020 Postponed : एमएचटी सीईटी परीक्षा पुढं ढकलली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील वैद्यकिय, औषधनिर्माणशास्त्र, कृषि व अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा MHTCET पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 14 एप्रिलपर्यत देशात लॉकडाऊन करण्यात आले असल्याने सीईटी सेलच्या वतीने घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

यावर्षी तब्बल 5 लाख विद्यार्थी MHTCET परीक्षेला सामोरे जाणार आहेत. ही परीक्षा 13 एप्रिलपासून 9 दिवस 18 सत्रांमध्येपार पडणार होती. 13 ते 17 एप्रिल आणि 20 ते 23 एप्रिल या काळात परीक्षा घेतली जाणार होती. परतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिल पर्यंत देशात लॉक डाऊनची स्थिती घोषित केली आहे. त्याचा विचार करता सीईटी सेलने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर त्या 14 एप्रिलच्या पुढील तारखाना होणार आहे. यंदा दरवर्षीपेक्षा 1 लाख 11 हजार 613 परीक्षार्थीची वाढ झाली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like