बापरे ! रात्री 2 वाजता लुटले MI चे 15 कोटी रूपयांचे मोबाईल, देशातील सर्वात मोठा दरोडा

चेन्नईः पोलीसनामा ऑनलाईन – नवरात्रोत्सवात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहेे. दोन दिवसांपूर्वी गुंडांनी 7 लाखांची बँक लुटल्यानंतर आता आणखीन एक मोठी घटना तामिळनाडूमध्ये (tamilnadu) समोर आली आहे. अज्ञात चोरट्यांनी MI कंपनीच्या (MI Phone Company) मोबाईल घेऊन जाणाऱ्या ट्रकवर दरोडा टाकून त्यातले मोबाईल लंपास केले आहेत. यामध्ये जवळपास 15 कोटींचं (15-crore) नुकसान झालं आहे. चोरट्यांनी ट्रक चालकावर हल्ला केला आणि त्याला गंभीर जखमी केलं त्यानंतर ट्रकमधील कार्टन्स लुटून पसार झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, मोबाईलने भरलेला हा ट्रक तमिळनाडूमधील श्रीपेरमपदूर औद्योगिक वसाहतीतून निघाला होता.या ट्रकमध्ये प्रत्येकी कार्टनला 960 मोबाईल या प्रमाणे 15 कार्टन्सवर चोरांनी डल्ला मारला आहे. एकूण 14 हजार 500 मोबाईलची साधारण किंमत 15 कोटी असल्याचं समोर आले आहे. तमिळनाडूमधील श्रीपेरमपदूर औद्योगिक वसाहतीतून निघाल्यानंतर हा ट्रक शूलगिरी इथे रात्री 2 च्या सुमारास पोहचला. त्यावेळी ट्रकला चोरट्यांंनी अडवलं तिथे बाचाबाची झाली. दरोडेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला. पेट्रोलिगसाठी आलेल्या पोलिसांना जखमी अवस्थेमध्ये ट्रक चालक अरुण आणि कुमार दोघे जण दिसले. या दोघांनी पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला.

द हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार यापूर्वीदेखील नेल्लोर, चित्तौड़, गुंटूर, वारंगल आदी जिल्ह्यात अशाच प्रकारे चोरीचा प्रकार घडला होता. रात्री उशिरा चोरांनी पाळत ठेवून या ट्रक चालकाला अडवलं आणि त्याच्यावर हल्ला केला. ट्रकमधील साहित्य घेऊन फरार झाले. अशाच प्रकार चोरी झाली होती. या प्रकरणी MI कंपनीकडून कोणतीही तक्रार अथवा अशा चोरीची माहिती पोलिसांना देण्यात आली नाही. ट्रक चालकाने पोलिसांना केवळ फिर्याद दिली आहे.