युजरनं पसरवली मिया खलिफाच्या सुसाईडची अफवा, पॉर्नस्टारनं केली बोलती बंद !

पोलीसनामा ऑनलाइन – पॉर्नहबची प्रसिद्ध पॉर्नस्टार मिया खलिफा हिनं पॉर्न इंडस्ट्रीसोबतचं तिचं नातं तोडलं आहे. परंतु तरीही ती कशामुळं ट्रेंड करताना दिसेल याचा काही नेम नाही. असंच काही झाल्याचं नुकतच समोर आलं होतं. अचानक मिया ट्विटरवर ट्रेंड करताना दिसली परंतु ती का ट्रेंड करत आहे हेच कुणाला समजलं नाही.

काही दिवसांपूर्वीच मिया खलिफाबद्दल एका युजरनं खोटी बातमी पसरवली की, मियानं सुसाईड केलं आहे. खास बात अशी की, मियानंही खास अंदाजात त्याला उत्तर दिलं. तिची प्रतिक्रिया पाहून अनेकांना हसू आवरलं नाही. मियाच्या सुसाईडची बातमी पसरायच्या आधीच तिनं त्याची बोलती बंद केली.

मियानं त्या युजरला उत्तर देत लिहिलं की, प्लिज असा विचार करू नका की, मी माझ्या प्रत्येक मित्रावर नजर ठेवत नाहीये ज्यांनी मला शोक संवेदना पाठवल्या नाहीत. मी तुम्हाला पहात आहे.

https://twitter.com/MemezSupplier/status/1275495488268140544?s=20

मिया ट्रेंड करताना दिसल्यावर अनेकांनी यावर वेगवेगळ्या रिअ‍ॅक्शन दिल्या आहेत. कारण ती का ट्रेंड करत आहे हेच त्यांच्या लक्षात आलं नाही.

https://twitter.com/KxnqOlonzo/status/1275458079627362304?s=20

मिायनं नुकतीच तिच्या नाकाची सर्जरी केली आहे. याचे फोटोही तिनं चाहत्यांसोबत शेअर केले होते. तिला स्वत:ला अजून सुंदर बनवायचं आहे असं तिनं सांगितलं आहे.