‘वर्ल्ड कप’ जिंकणार्‍या कॅप्टननं घेतला ‘तलाक’, आईकडं राहणार ‘मुलगी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑस्ट्रेलियाला पाचवा विश्वचषक जिंकून देणाऱ्या कॅप्टन मायकेल क्लार्कच्या वैयक्तिक आयुष्याला धक्का बसला आहे. लग्नाच्या 7 वर्षानंतर मायकेल क्लार्क आणि त्याची पत्नी काइली बोल्डी यांनी घटस्फोट घेतला आहे. क्लार्क आणि कायली यांनाही एक 4 वर्षाची मुलगी आहे. 15 मे 2012 रोजी मायकेल क्लार्कने मॉडेल काइली बोल्डीशी लग्न केले होते.

माध्यमांना घटस्फोटाची माहिती देताना मायकेल क्लार्क म्हणाले, ‘काही काळ एकत्र राहिल्यानंतर आम्ही विभक्त होण्याचा एक कठीण निर्णय घेतला आहे. आम्ही एकमेकांचा आदर करतो आणि या निर्णयावर आलो की आमची मुलगी तिच्या आईबरोबरच राहील. मिळालेल्या माहितीनुसार, क्लार्क आणि काइली यांचा घटस्फोट चार कोटी ऑस्ट्रेलियन डॉलर (जवळपास 192 कोटी) मध्ये झाला. काइली आपली मुलगी केलेसे बरोबर वॉक्‍लूजमध्ये राहणार आहे.

दरम्यान, 2018 मध्ये मिळालेल्या माहितीनुसार मायकेल क्लार्कचे त्याच्या असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध आहेत. साशा आर्मस्ट्राँग असे या असिस्टंटचे नाव आहे, जी मायकेलची संपूर्ण क्रिकेट अकादमी सांभाळते. या दोघांची काही छायाचित्रे मीडियामध्ये लीक झाली होती, जात ते दोघेही लक्झरी नौकेमध्ये बसलेले दिसत आहेत. चित्रांमधून दोघांमध्ये बरीच जवळीक दिसत होती. क्लार्कने या प्रकरणामुळे आपली पत्नी कायलीशी घटस्फोट घेतल्याची शंका व्यक्त केली जात आहे

मायकेल क्लार्कने ऑस्ट्रेलियाला आयसीसी विश्वचषक 2015 चे विजेतेपद जिंकून दिले होते. तसेच, टी-20 साठी ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद सांभाळणारा तो पहिला कर्णधार आहे. क्लार्कने ऑगस्ट 2015 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. क्लार्कने 115 कसोटी सामन्यात 8643 धावा, 245 एकदिवसीय सामन्यात 7981 धावा आणि 34 टी -20 सामन्यात 488 धावा केल्या आहेत. यावेळी क्लार्कने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 36 शतके ठोकली. क्लार्क हा आपल्या काळातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो.

या जोडप्याचे वेगळे होणे थोडे आश्चर्यचकित करणारे आहे, कारण एका वर्षापूर्वी काइलीने म्हटले होते की, तिचे आणि क्लार्कचे लग्न आणि रिलेशनशिप काळानुसार अधिक मजबूत झाले आहे. दरम्यान, हे जोडपे विभक्त झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. पण आता दोघांनीही संमतीने एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.