काय मायकल जॅक्सनला होतं ‘पॉर्न’चं व्यसन ? 11 वर्षांनंतरदेखील मृत्यूचं रहस्य कायम !

पोलीसनामा ऑनलाइन टीम :  प्रसिद्ध दिवंगत अमेरिकन पॉप स्टार आणि ब्रेक डान्सर मायकल जॅक्सन यानं 25 जून 2009 रोजी हार्ट अटॅकमुळं जगाचा निरोप घेतला. आज (गुरुवार दि 25) त्याच्या पुण्यतिथी निमित्त आपण त्याच्या आयुष्यावरील काही न सुटलेले प्रश्न आणि काही रोचक तथ्य जाणून घेणार आहोत.

एक पोलीस रिपोर्ट सार्वजनिक झाल्यानंतर अशी माहिती समोर आली होती की, 2003 मध्य जेव्हा पोलिसांनी मायकल जॅक्सनच्या नेवरलँड येथील घरी छापा मारला होता जे पाहून सारेच अवाक् झाले होते. पोलीस अधिकाऱ्यांना या छापेमारीत जे काही सापडलं त्यावरून समजलं की, त्याला पॉर्नचं व्यसन होतं. खास करून चाईल्ड पॉर्नचं. त्यानं मुलांच्या नग्न फोटोंचं कलेक्शन केलं होतं. हे सगळं पाहून अधिकारी हैराण झाले होते. कारण या प्रकारच्या सामग्रीचा वापर मुलांचं लैंगिक शोषण करणारे लोक करतात.

एका मासिकात नवीन अधिकाऱ्याच्या हवाल्यानं असं लिहण्यात आलं होतं की, छापेमारीत जे काही फोटो मिळाले आहेत त्यात दिसत होतं की, काही नग्न फोटोंवर मुलांचे चेहरे लावण्यात आले आहेत.

1994 मध्ये मायकल जॅक्सननं लग्न केलं. दोनच वर्षात हे लग्न तुटलं. नंतर त्यानं दुसरं लग्न केलं. हेही चाललं नाही. काही वर्षांनंतर त्याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाले. इथूनच त्याच्या ऱ्हासाला सुरुवात झाली.

मायकलवर झालेले अनेक आरोप आणि धुळीत मिळतं स्टारडम पाहून तोही खूप तुटला होता. असंही सांगितलं जातं की, तो अंमली पदार्थांचं सेवन करू लागला होता. मायकलच्या मृत्यूनंतर अनेक सवाल उपस्थित करण्यात आले होते. मायकलच्या डॉक्टरवर निष्काळजीपणा केल्याचा आरोपही झाला होता. हा आरोप सिद्ध झाल्यानंतर डॉक्टरला शिक्षाही झाली होती.