पर्रिकरांनी पद सोडले तर संकटाची स्थिती निर्माण होईल ! 

पणजी : वृत्तसंस्था – गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती दिवसेंदिवसं खालावत आहेत. तरही ते आपले काम पाहत आहेत. हे लोकांनी लक्षात घ्यावे. त्यांनी जर आपले पद सोडले किंवा ते जर नसले तर संकटाची स्थिती निर्माण होईल, अशी माहिती गोव्याते विधानसभा उपाध्यक्ष मायकल लोबो यांनी दिली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

आपले मुख्यमंत्री खूपच आजारी आहेत. हे लोकांनी आता लक्षात घ्यायला हवे. देवाच्या कृपेने ते अद्यापही आपल्यात आहेत. देवानेच त्यांना काम करण्यासाठी आशिर्वाद दिला आहे. त्यामुळे जोपर्यंत मनोहर पर्रिकर आहेत भाजपा युती सरकारला कोणतेही संकट नाही. मात्र, त्यांनी जर आपले पद सोडले किंवा ते जर नसले तर संकटाची स्थिती निर्माण होईल, असं लोबो यांनी सांगितलं.

पर्रिकर नुकतेच गोवा विधानसभेचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी विधानसभेत आले होते. तेव्हा ते श्वासनलिकेसह वावरताना दिसले. यावर आता लोबो यांनी पर्रिकरांची प्रकृती खालावत असल्याची माहिती दिली आहे.

विश्वचषकासाठी भारतीय संघच प्रबळ दावेदार : सचिन तेंडुलकर

दरम्यान, मनोहर पर्रिकर स्वादुपिंडाच्या कर्करोगाने त्रस्त आहेत. गेल्या वर्षी त्यांना त्रास होऊ लागल्याने सुरुवातीला मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर दोन महिने अमेरिकेत उपचार झाले. त्यानंतर दिल्लीतील एम्स रुग्णालयातही त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र तरीही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होताना दिसत नाही.