हे जग महिलांसाठी धोकादायक : मिशेल ओबामा  

वॉशिंग्टन (अमेरिका) : वृत्तसंस्था 
#MeToo या हॅश टॅगच्या माध्यमातून आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचार विरोधात जगभरातील महिलांनी आवाज बुलंद केला असून आता जागतिक राजकीय वर्तुळातही यावर चर्चा सुरु झाली आहे . #MeToo या हॅश टॅगच्या माध्यमातून लैंगिक अत्याचाराबाबत रोज नवीन नवीन खुलासे समोर येत आहेत. याच दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या मोहिमेची खिल्ली उडविली , ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया यांनीही मी टू मोहिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले असताना तसेच माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांनी मात्र  या मोहिमेला पाठिंबा दर्शविला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’46d22f14-ce08-11e8-b366-17157697c2b9′]

”हे जग महिला आणि मुलींसाठी धोकादायक आहे. आता मात्र हद्द झाली”, अशा शब्दांत त्यांनी सध्यस्थितीबाबत भाष्य करत #MeToo मोहिमेचे समर्थन केले आहे. आंतरराष्ट्रीय बालिका दिनाच्या निमित्ताने एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात त्यांनी महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

#MeToo ही मोहिम भावी पिढीसाठी ठिणगी बनेल. यामुळे तरुण महिलांना त्यांचा मार्ग स्वतः निवडता येईल. हे जग मुली आणि महिलांसाठी धोकादायक आहे आणि आम्ही हे पुन्हा पुन्हा पाहत आहोत. सध्या महिलांना कमी लेखले जात आहे. त्या आवाज उठवत आहेत; मात्र त्यांना कोणी प्रतिसाद देत नाही. त्यामुळे त्या त्रस्त आहेत, अशी खंत मिशेल ओबामा यांनी व्यक्त केली आहे.

या कारणामुळे अक्षयने ‘हाऊसफुल्ल 4’ चं शूटिंग रद्द केलं !

#MeToo या मोहिमेची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या मोहिमेची खिल्ली उडविली आहे. या मोहिमेद्वारा माध्यमांकडून लागू केल्या जाणाऱ्या नियमांमुळे आपल्या स्वतःवर नियंत्रण ठेवावे लागत आहे, असे वक्तव्य ट्रम्प यांनी पेन्सिलवेनिया येथे मध्यावधी निवडणुकीच्या रॅली दरम्यान केले आहे.

दरम्यान, ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया यांनीही मी टू मोहिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. मी टू मोहिमेतंर्गत पुरुषांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप करणाऱ्या महिलांनी ठोस पुरावे देण्याची गरज आहे, असे मेलानिया ट्रम्प यांनी म्हटले आहे.

५० लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी भाजप आमदार योगेश टिळेकरांसह तिघांविरूध्द गुन्हा

लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या महिलांनी जगभरात मी टू मोहीम चालवली आहे. भारतातील महिलांनीही या मोहिमेच्या माध्यमातून आपल्यावर झालेल्या लैंगिक शोषणा विरोधात आवाज उठविला आहे. या मोहिमेमुळे बॉलिवूड हादरले आहे. हे मोहिमेचे लोण बॉलिवूड पासून राजकारणापर्यंत पोहचले आहे.

 [amazon_link asins=’B071HWTHPH,B07DJHV6S7′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’256e6b06-ce0d-11e8-97c8-b5d0e0e0e693′]