आता ‘चोरी’स गेलेल्या वाहनांचा ‘शोध’ सहज घेता येईल ! सरकारनं आणला नवीन नियम

नवी दिल्ली : वृत्त संस्था- आता तुमची गाडी चोरीस गेली तर ती शोधणे जास्त सोपे झाले आहे. तसेच वाहन चोरीच्या घटनांनाही आळा बसणार आहे. वाहनांच्या सुरक्षेसाठी सरकारने स्पेयरपार्टवर मायक्रोडॉट लावण्याचा नियम केला आहे.

गाड्यांची सुरक्षा वाढली
रस्ते परिवहन आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने आपल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, केंद्रीय मोटर वाहन नियम १९८९मध्ये बदल करून वाहन, त्याचे स्पेयर पार्ट, कम्पोनन्टवर मायक्रोडॉट लावण्यासंबंधी वाहन निमिर्ती कंपन्याना अधिसूचित करण्यात आले आहे. यासंदर्भातील सूचनांवर विचार करणे सुरू आहे. मंत्रालयाने सांगितले की, मायक्रोडॉटमुळे वाहनांची सुरक्षा वाढण्यास मदत होणार आहे.

काय आहे तंत्रज्ञान
रस्ते परिवहन मंत्रालयाने म्हटले आहे की, नव्या अधिसूचनेनुसार मोटर वाहन आणि त्याचे स्पेयरपार्ट, कम्पोनन्ट अथवा अन्य भागावर लावण्यात येणारे मायक्रोडॉट वाहन उद्योग मानक (एआईएस)-१५५ नुसार असतील. मायक्रोडॉट तंत्रज्ञांनानुसार वाहनाचे स्पेयरपार्ट व कोणत्याही मशीनवर खुप छोट्या आकारातील ठिपके स्प्रे केले जातात. यामुळे त्या भागाची एक वेगळी ओळख तयार होते. या तंत्रज्ञांनाचा वापर करून चोरीस गेलेली वाहने शोधण्यात मदत होणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/