Microplastics Side Effects | तुमच्या रक्तात आणि फुफ्फुसात प्लास्टिकचे कण भरत आहेत? रोजच्या वापरातील ‘या’ 13 वस्तू, कधीही कोंडू शकतो श्वास; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मायक्रोप्लास्टिक्स (Microplastics) मुळे पर्यावरण दूषित होण्याचा आणि काही प्रजातींचा नाश होण्याचा मोठा धोका आहे. परंतु असे पुरावे देखील आहेत की प्लॅस्टिकचे छोटे कण किंवा तुकडे देखील मानवी आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात (Microplastics Side Effects). काही अभ्यासांनी दुजोरा दिला आहे की प्लास्टिकचे कण मानवी रक्त आणि वायुमार्गात प्रवेश करत आहेत (Microplastics Side Effects).

 

प्लॅस्टिकचे छोटे कण मानवी आरोग्यासाठी किती घातक ठरू शकतात यावर सध्या अनेक अभ्यास सुरू आहेत, मात्र हे सूक्ष्म कण फुफ्फुसात राहून नुकसान करू शकतात. यामुळे फुफ्फुसाचा आजार असलेल्या लोकांमध्ये गंभीरता येऊ शकते (Microplastics Side Effects).

 

असे मानले जाते की, हे कण जास्त काळ फुफ्फुसात राहू शकतात आणि फुफ्फुसात सूज राहू शकते. कण किती मोठा आहे हे देखील महत्त्वाचे आहे कारण हे कण जास्त हानिकारक असू शकतात. तज्ज्ञांनी एका अभ्यासात सांगितले आहे की, रोज वापरल्या जाणार्‍या कोणत्या वस्तू रक्त आणि फुफ्फुसात मायक्रोप्लास्टिक भरतात. (Food Injecting Microplastics)

 

फुफ्फुसात सापडले 12 प्रकारचे प्लास्टिकचे तुकडे (12 Types Of Plastic Pieces Found In The Lungs)
सायन्स ऑफ द टोटल एन्व्हायर्नमेंटमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या अभ्यासात खालच्या फुफ्फुसासह फुफ्फुसाच्या सर्व भागांमध्ये मायक्रोप्लास्टिक आढळून आले आहे. संशोधकांनी 12 प्रकारचे प्लास्टिक ओळखले, ज्यात पॉलीप्रोपीलीन आणि पॉलीथिलीन तसेच टेरेफ्थालेट आणि राळ यांचा समावेश आहे.

कोणत्या वस्तूंमध्ये आढळतात प्लास्टिकचे कण (In Which Objects Are Plastic Particles Found) ?
हे प्लॅस्टिक सामान्यत: पॅकेजिंग, उत्पादनाच्या बाटल्या, कपडे, दोरी आणि सुतळीमध्ये आढळतात. मायक्रोप्लास्टिक्सच्या सर्वात धोकादायक स्त्रोतांमध्ये शहरातील धूळ, कापड आणि टायर यांचा समावेश होतो.

 

खाद्यपदार्थांमध्येही प्लास्टिक (Plastic In Food Too)
तज्ज्ञांच्या मते, अनेक खाद्यपदार्थ आणि पेयेही शरीरात मायक्रोप्लास्टिक्स भरत आहेत. यामध्ये बाटलीबंद पाणी, मीठ, सीफूड, टीबॅग, तयार अन्न आणि कॅन केलेले पदार्थ यांचा समावेश आहे.

 

प्लास्टिकच्या कणांमुळे होणारे नुकसान (Damage Caused By Plastic Particles)
प्लॅस्टिकचे कण फुफ्फुसाच्या ऊतींचे नुकसान करतात, ज्यामुळे कर्करोग, दम्याचा झटका आणि इतर आरोग्य समस्या उद्भवतात.

 

फुफ्फुसाचे नुकसान होण्याचा धोका (Risk Of Lung Damage)
पॉलिस्टर आणि नायलॉन तंतूंमधून निघणार्‍या मायक्रोप्लास्टिक कणांमुळे कापड कामगारांमध्ये खोकला,
श्वास लागणे आणि फुफ्फुसाची क्षमता कमी होत असल्याचे एका अभ्यासात आढळून आले आहे.

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Blood Sugar Level Control | bhindi water can reduce blood sugar level of diabetes patient

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Level Control | भेंडीच्या पाण्याने ब्लड शुगर कंट्रोल ! डायबिटीजच्या रूग्णांनी दररोज सकाळी करावे ‘हे’ एक काम

 

Superfoods for Weight Loss | लठ्ठपणा कमी करण्यासाठी मदत करू शकतात ‘हे’ 7 सुपरफूड्स, तात्काळ करा डाएटमध्ये समावेश; जाणून घ्या

 

PM Kisan Yojana | शेतकऱ्यांसाठी खूशखबर ! मोदी सरकार ‘या’ दिवशी PM किसानचा 11 वा हप्ता जाहीर करणार; जाणून घ्या