‘मायक्रोसॉफ्ट’च्या CEO चा CAA ला विरोध, म्हणाले – ‘बांगलादेशी निर्वासिताला अध्यक्ष म्हणून पाहायला आवडेल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन संपूर्ण भारत ढवळून निघालेला असताना आता मायक्रोसॉफ्ट या जगप्रसिद्ध कंपनीचे सीईओ सत्या नाडेला यांनीसुद्धा भारतातील परिस्थिती आणि CAA कायद्याची अंमलबजावणी दुःखद असल्याचं एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.”माझ्या मते भारतात सध्या जे काही सुरु आहे ते दुखद आहे. परिस्थिती वाईट आहे,” असं मत नाडेला यांनी बझफीडचे संपादक बेन स्मिथ यांच्याशी बोलताना व्यक्त केले.

नाडेला हे मायक्रोसॉफ्टच्या मॅनहॅटन येथील कार्यक्रमात बोलत होते. पुढे बोलताना त्यांना बांगलादेशमधून आलेला एखादा निर्वासित भारतातील एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीचा कार्यकारी अध्यक्ष झाल्याचेही मला पहायला आवडेल अशी इच्छा व्यक्त केली. “मला बांगलादेशमधून भारतात आलेला निर्वासित भारतात एखादी कंपनी सुरु करताना किंवा थेट इन्फोसिसचा पुढील कार्यकारी अध्यक्ष म्हणून पहायला आवडेल,” असं नाडेला म्हणाले. “प्रत्येक देशाने आपल्या सीमा ठरवणे गरजेचे असते. प्रत्येक देश आपले राष्ट्रीय सुरक्षा धोरण ठरवून त्याप्रमाणे निर्वासितांसाठी धोरणे ठरतो.

लोकशाहीमध्ये हे सर्व निर्णय त्या राष्ट्राचे लोक आणि तेथील सरकार चर्चा आणि वादविवादाच्या माध्यमातून नियमांमध्ये राहून घेतात. माझ्यावर भारतीय संस्कृतीचा प्रभाव आहे. संस्कृतीक वैविध्यता असणाऱ्या भारतासारख्या देशामध्ये जन्मल्यानंतर मी अमेरिकेमध्ये आलो. भारत हा असा देश हवा जिथे निर्वासित व्यक्ती येऊन एखादी कंपनी सुरु करेल आणि तिची भरभराट होईल किंवा निर्वासिताने सुरु केलेल्या कंपनीचा देशाला आणि अर्थव्यवस्थेला फायदा होईल अशी माझी इच्छा आहे,” असं नाडेला पुढे बोलताना म्हणाले.

फेसबुक पेज लाईक करा –