Microsoft Data Center Pune | मायक्रोसॉफ्ट पुण्यात डेटा सेंटर स्थापन करण्यासाठी 3200 कोटी रुपये गुंतवणूक करणार

स्वित्झर्लंड / दावोस : वृत्तसंस्था – Microsoft Data Center Pune | जागतिक आर्थिक परिषदेदरम्यान (World Economic Forum) वेगवेगळ्या देशातील जवळपास तेवीस कंपन्यांनी सुमारे 30 हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार (Maharashtra Sign MoU in Davos) केले आहे. या माध्यमातून सुमारे 66 हजार जणांना रोजगार मिळणार असल्याचा विश्वास राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई (Maharashtra Minister Subhash Desai) यांनी यावेळी व्यक्त केला आहे. यामध्ये मायक्रोसॉफ्ट पुण्यात डेटा सेंटर (Microsoft Data Center Pune) स्थापन करण्यासाठी 3200 कोटी रुपये रक्कम गुंतवणूक (Investment) करणार असल्याचं ते म्हणाले.

 

राज्याच्या अर्थव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 या उपक्रमाची संकल्पना मांडण्यात आली. यावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Dr. Nitin Raut), मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंग (Ashish Kumar Singh), अतिरिक्त मुख्य सचिव (उद्योग) बलदेव सिंग (Baldev Singh), महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल (Vijay Singhal), एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनबलगन (Dr. Anbalagan), सह मुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी. मलिकनेर (P. D. Malikner) आदी उपस्थित होते. (Microsoft Data Center Pune)

या उपक्रमाअंतर्गत एकूण दहा आवृत्या आयोजित केल्या आहेत. याद्वारे आजतगायत 121 सामंजस्य करार झाले आहे. त्यामधून महाराष्ट्रात एकूण 2.15 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक प्राप्त झाली आहे. या माध्यमातून सुमारे 4 लाख रोजगार निर्माण होणार आहे.

 

दावोस (Davos) येथील महाराष्ट्र लाउंजमध्ये झालेल्या सामंजस्य करारामध्ये एकूण 30,379 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहे.
यामुळे महाराष्ट्रात सुमारे 66 हजार जणांना रोजगार मिळणार असल्याचा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, आज झालेल्या विविध गुंतवणूक करारात 55 टक्क्यांहून जादा गुंतवणूक सिंगापूर, इंडोनेशिया, अमेरिका आणि जपान आदी देशांतील आहे.
यात प्रामुख्याने औषध निर्माण, वस्त्रोद्योग, अभियांत्रिकी, पॅकेजिंग, पेपर पल्प व अन्न प्रक्रिया, स्टिल, माहिती तंत्रज्ञान,
डेटा सेंटर, लॉजिस्टिक आदी क्षेत्रांचा समावेश असल्याचं सांगण्यात आलं आहे.

 

Web Title :- Microsoft Data Center Pune | maharashtra sign 30000 crore investment mou in davos world economic forum Microsoft Data Center Pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा