काय सांगता ! होय, बिल गेट्सनं खरेदी केलं 4600 कोटींचं जहाज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या पंगतीत दुसऱ्या स्थानावर असणारे आणि मायक्रोसॉफ्ट चे सहसंस्थापक बिल गेट्सने ‘सुपर याट’ हे आलिशान जहाज खरेदी केले असून त्याची किंमत १ किंवा २ कोटी नव्हे तर तब्बल ४६०० कोटी एवढी आहे. या जहाजचे वैशिष्ट्ये म्हणजे हे जहाज लिक्विड हायड्रोजनवर चालते.

सुट्टीचा आनंद घेण्यासाठी त्यांनी हे जहाज खरेदी केले आहे . या जहाजात ५ डेक असून ते जहाज ३७० फूट एवढे लांब आहे . यात १४ पाहुणे आणि ३१ क्रू मेंबर, एक जिम, एक योगा स्टुडिओ, ब्युटी रूम, मसाज पार्लर आणि स्विमिंग पूल बनवण्यात आले आहेत. जहाजात रात्री थंडी वाजू नये म्हणजे कोळसा किंवा लाकडाचा वापर न करता जेल फ्लूड फायर बॉल्सचा उपयोग करण्यात येणार आहे. यादी ते जहाज भाड्याने घेत असता , त्यांचे स्वत:चे जहाज तयार होण्यासाठी २०२४ पर्यंतचा अवधी लागेल. यात हायड्रोजन असल्याने ते केवळ पाण्याचे उत्सर्जन करेल.

जहाजाच्या मागच्या डेकमधील बाजूला एल पुलं असून तो थेट समुद्राशी जोडण्यात आलेला आहे. हे जहाज प्रतितासला ३२ किमी चा प्रवास करते. सुपरयाट हे एकदा लिक्विड हायड्रोजनने फुल केले असता ते साधरणत: ६४३७ किमीचे अंतर कापू शकते. म्हणजे ते अंटार्तिका ते न्यूयॉर्क ते साऊथहॅम्प्टन पर्यंत प्रवास करू शकते. तसेच या जहाजामध्ये दोन रूम , दोन व्हीआयपी स्टेट रूम आणि पॅव्हेलियन दिला आहे.