Maharashtra Political Crisis | महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागणार, राष्ट्रवादीच्या नेत्याचं भाकीत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) निकाल तुमच्या बाजूने लागलाय आमचे काही म्हणणे नाही. न्यायालयाने पक्षातील फूट मान्य नाही असे का म्हटले. सर्वोच्च न्यायालय खूप गंभीर आहे. दिल्लीचा जो निकाल दिलाय, तेव्हा कोर्टाने सांगितले तात्काळ सुनावणी होईल.(Maharashtra Political Crisis) महाराष्ट्रातही शिंदे सरकार (Shinde Government) अपात्रतेचा मुद्दा एक वर्ष खेचतील असे काही होणार नाही, असे सांगत महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका (Mid-Term Elections) लागणार असल्याचे भाकीत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांनी केलं आहे.

आव्हाड पुढे म्हणाले, ज्यांना राजकारणात शरद पवार (Sharad Pawar) यांनी आणले त्यांनी पवारांच्या नैतिकतेवर बोलावे, हे कठीण आहे. कोर्टाने 141 पानांची रूल बुक (Rule Book) दिली आहे. त्यानुसार चालावे लागणार (Maharashtra Political Crisis) त्यामुळे जर तरला अर्थ नाही. अपात्रतेचा अर्ज टाकला त्या दिवशीचा विचार विचार करायचा हे स्पष्ट म्हटले आहे. तेव्हाचा राजकीय पक्ष शिवसेना (Shivsena) होता. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Party Chief Uddhav Thackeray) होते. न्यायालयानेच विधी मंडळ पक्ष महत्त्वाचा नाही, असे म्हटले आहे, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

 

व्हिप (Whip) हा पक्षप्रमुख नसतो. त्यानुसार सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांचा व्हीप लागू होतो.
यावर चर्चा करण्यात आणि नागरिकांमध्ये गैरसमज पसरवण्यात काही अर्थ नाही.
माझ्या अंदाजानुसार महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागतील. म्हणजे तो गेला आहे फक्त जाहीर करायचे माहिती नाही,
अशी त्यांची अवस्था असल्याची टीका आव्हाड यांनी केली. परमबीर सिंह (IPS Parambir Singh) यांचे निलंबन रद्द करण्यात आले. यावर बोलताना आव्हाड म्हणाले, इतका कर्तव्यदक्ष अधिकारी आहे त्यावर काय बोलायला लवाता, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.

 

Web Title :- mid term elections to be held in maharashtra jitendra awhads political
predictions from the rule book of sc verdict on eknath shinde vs uddhav thackeray political crisis

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Crime Branch News | पुणे पोलिस क्राईम ब्रँच न्यूज : मित्रांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी पिस्टल बाळगणार्‍याला सराईत गुन्हेगाराला अटक

MP Shrikant Shinde | ‘निवडणुकीची खुमखुमी असेल तर…’, खा. श्रीकांत शिंदेंचं उद्धव ठाकरे गटाला थेट आव्हान (व्हिडिओ)

Aryan Khan Cruise Case | आर्यन खान प्रकरणी समीर वानखेडेंवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, सीबीआयची छापेमारे

Chitra Wagh | ‘उद्धवजी, ज्या दिवशी तुम्ही राजीनामा दिला त्याच दिवशी महाविकास आघाडीचा पोपट मेला, कायद्याची भाषा समजत नसेल तर…’

Chandrakant Patil – Pune Kharip Hangam | पुणे जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न ! बोगस बियाणे, खते, बोगस किटकनाशक प्रकरणात गुन्हे दाखल करा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील