एमआयडीसीतील गोडावून फोडले : १६ लाखांचा माल लांबविला

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – एमआयडीसीतील गोडावूनचा पत्रा उचकटून चोरट्यांनी सुमारे १६ लाख रुपयांचा माल चोरून नेला आहे. या धाडसी चोरीमुळे एमआयडीसी परिसरात खळबळ उडाली आहे. स्थानिक गुन्हे शाखा, एमआयडीसी पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.

एमआयडीसी परिसरात सेफ एक्सप्रेस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनीचे गोडाऊन आहे. ही कंपनी एल अँड टीसह इतर महत्त्वाच्या कंपन्यांचा माल बाहेर पुरवठा करते. मंगळवारी (दि. २५) रात्री अकरा वाजता सदर गोडावूनच्या शटरला कुलूप लावण्यात आले. बुधवारी (दि. २६) सकाळी गोडावूनचे शटर उचकटलेले दिसले. चोरट्यांनी शटरचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला. आतील एसी, लॅपटॉप व इतर विविध कंपन्यांचे साहित्य असा एकूण १५ लाख ८१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

चोरीची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्यासह एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. याप्रकरणी बुधवारी (दि. २६) रात्री उशिरा राकेश कुमार पांडे (मुळ रा. बबनपुरा, ता. जमानिया, जि. गाजीपुर, उत्तरप्रदेश, हल्ली रा. कॉटेज कॉर्नर, सावेडी, नगर) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सहारे हे करीत आहेत. एमआयडीसी परिसरातील या धाडसी चोरीमुळे खळबळ उडाली असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

आजपासून योगा करण्याचा संकल्प करणार असाल तर या “आसनांपासून” करा सुरुवात 

मधुमेह, मानसिक आजार आणि हृद्यरोगाला दूर ठेवण्यासाठी करा हे “प्राणायम” 

ह्रदयाची घ्या अशी काळजी , कधीही होणार नाहीत ब्लॉकेजेस …!

गर्भधारने दरम्यान महिलांनी घ्या व्यायामाची अशी ” काळजी “

सिनेजगत

मराठी चित्रपटाच्या ‘ट्रेलर’ लॉंचिंगला आलेल्या ‘किंग’ शाहरुखने खुलेआम ‘उतरवली’ !

अभिनेत्री एमी जैक्सन ‘भावी’ पतीसोबत एन्जॉय करतेय ‘प्रेग्नेंसी फेज’