इराणी कमांडर ‘सुलेमानी’च्या अंत्ययात्रेदरम्यान ‘चेंगराचेंगरी’, 35 जण ठार तर 48 जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : बगदाद येथे अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मारले गेलेल्या इराणी सैन्याचा सर्वोच्च कमांडर कसीम सोलेमानी याच्या अंतिम यात्रेत लाखो लोक जमा झाले. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ३५ लोकांचा मृत्यू झाला असून सुमारे ४८ लोक जखमी झाले आहेत. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या दक्षिण पूर्व भागात असलेल्या करमान या सुलेमानी यांच्या मूळ गावी ही घटना घडला. या अंत्यसंस्काराच्या मिरवणुकीत १ दशलक्षाहून अधिक लोक उपस्थित होते.

दरम्यान, या मिरवणुकीत मृत्यूचा नेमका आकडा अद्याप समोर आला नाही. याआधी इराणची राजधानी तेहरान येथे सोमवारी १० लाख लोकांनी सुलेमानी यांच्या पार्थिवाच्या अंतिम दर्शनास भेट दिली होती. करमानमध्ये सुलेमानींना निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने लोक आले होते. तेहरान, कोम, मशहाद आणि अहवाजमधील लाखो लोक रस्त्यावर उपस्थित होते. आझादी चौकात मोठ्या संख्येने लोक जमले होते, तिथे राष्ट्रध्वजांनी लपेटलेल्या दोन तंबूत ठेवल्या होत्या. एक शवपेटी सुलेमानी आणि दुसरे त्यांचे निकटवर्तीय ब्रिगेडियर जनरल हुसेन पुराजाफरी यांचे होते.दुपारी साडेचारच्या दरम्यान कब्रिस्तानमध्ये सुलेमानीच्या पार्थीवाला ‘सुपर्द-ए-खाक’ करण्यात येणार आहे.

अंत्यसंस्कारादरम्यान लोकांनी सुलेमानी, इराणी ध्वज आणि बॅनर आणि अमेरिकेविरूद्ध लिहिलेल्या घोषणा यांचे फोटो घेतले. जनसमुदायाला संबोधित करतांना जनरल सुलेमानी यांची मुलगी झैनाब म्हणाली, “माझ्या वडिलांच्या हौतात्म्याने लोकांना अधिकच खळबळ उडवून दिली आहे. ही अमेरिका आणि इस्त्राईलच्या समाप्तीची सुरुवात आहे.” इराकमध्ये आपल्या सैनिकांच्या मृत्यूसाठी अमेरिकेने सुलेमानीला जबाबदार धरले. सुलेमानी सिरियामध्ये राष्ट्राध्यक्ष बशर-अल-असदला पाठिंबा देत होते, त्यामुळे ते अमेरिकेच्या निशाण्यावर होते.

इराणचे सर्वोच्च कमांडर आणि भारताचं असं होत नातं :
अमेरिकेच्या रॉकेट हल्ल्यात इराणच्या लष्कराचा प्रमुख मेजर जनरल कासिम सुलेमानी ठार झाल्यांनतर अमेरिका-इराणमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले कि, भारत आणि लंडनमध्ये झालेल्या कारवायांमध्ये अप्रत्यक्षपणे सुलेमानीची भूमिका असल्याचा दावा शनिवारी दावा होता. भारतातील कारवाईचा स्पस्ष्ट उल्लेख नसला तरी, मात्र 2012 मध्ये दिल्लीत इस्रायलच्या संरक्षण दलातील अधिकाऱ्याच्या पत्नीवर झालेल्या हल्ल्याचा संबंध याच्याशी जोडला गेला. कारला मॅग्नेट लावून हा स्फोट घडवून आणण्यात आला होता. मात्र, तरीही सुलेमानी यांनी बऱ्याच वेळा भारताची बाजू घेतल्याची माहिती समजते आहे.

कूलभूषण जाधव प्रकरणीदेखील सुलेमानी यांनी भारताची बाजू घेतली होती. पाकिस्तान सरकारने इराणच्या सरकारवर आरोप करत म्हटलं होतं की, पाकिस्तानविरुद्ध कारवाईसाठी भारताकडून इराणच्या भूमीचा वापर केला जात आहे. पाकिस्तानचा हा आरोप फेटाळत जनरल सुलेमानी यांनी कुलभूषण प्रकरणी भारताला मदत केली होती. तसेच, भारत-इराण यांच्यातील चाहाबार पोर्ट करारामध्येही सुलेमानी यांची महत्वाची भूमिका होती. सुलेमानी यांच्यावर हल्ल्यानंतर भारतात कारगिल आणि लखनऊ इथ शिया समुदायाने निषेध नोंदवला आहे.

दरम्यान, जनरल सुलेमानीच्या हत्येनंतर इराणने अमेरिकेला याचे परिणाम भोगावे लागतील, असा थेट इशारा दिला आहे. गुप्त कारवायांसाठी जनरल कासिम सुलेमानीला ओळखलं जात होतं. सिरियातील संघर्षातही इराणने हस्तक्षेप केला होता. यात जनरल सुलेमानीने महत्वाची भूमिका पार पाडली होती. २००६ मधील इस्रायल हिजबुल्लाह युद्धातमधेही त्यांनी लेबनानमध्ये नेतृत्व केलं होतं.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/