Coronavirus : दुबईत पार्क, हॉटेल उघडली ; जनजीवन पूर्ववत होण्याच्या मार्गावर

दुबई – संयुक्त अरब अमिराती (United Arab Emirates) सरकारने देशातील व्यवसाय, पर्यटनाशी संबंधित उद्योग सुरू करण्यास आणि सार्वजनिक पार्क उघडण्यास परवानगी दिली आहे. त्याचबरोबर हॉटेलमध्ये आलेल्या पर्यटकांना खासगी बीचवर जाण्याची परवानगीही देण्यात आली आहे, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी दुबई सरकारने लॉकडाउन जाहीर केला होता. सरकारने विविध व्यवसायांतील उद्योगांसाठी वेगवेगळी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली असून या तत्त्वांचं पालन करून व्यावसायिक व्यवसाय करू शकतात. त्यामुळे रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण मशिदी, चित्रपटगृहं आणि नाइट क्लब मात्र बंदच राहणार आहेत.