इराकमध्ये 21 दहशतवाद्यांना आणि मारेकर्‍यांना सामूहिक फाशीवर लटकावले; 2 आत्मघाती हल्ल्यात होते सहभागी

बगदाद : वृत्तसंस्था – इराकमध्ये 21 दहशतवादी आणि मोरकर्‍यांना सोमवारी सामूहिक पद्धतीने फासावर लटकावण्यात आले. इराकच्या अंतर्गत मंत्रालयाने एक वक्तव्य जारी करून ही माहिती दिली. दक्षिण इराकच्या नासिरिया शहरातील जेलमध्ये या लोकांना फाशी देण्यात आली. यामध्ये इराकचे उत्तर शहर तल अफरमध्ये झालेल्या दोन आत्मघाती हल्ल्यात सलग्न लोकांचा समावेश आहे. या हल्ल्यांमध्ये अनेक लोक मारले गेले होते. वक्तव्यात फासावर लटकवण्यात आलेल्या लोकांची ओळख सांगण्यात आली नाही आणि कोणत्या गुन्ह्यात त्यांना दोषी ठरवण्यात आले हेदेखील सांगण्यात आले नाही.

अमेरिका समर्थक सैन्य अभियानात 2014 ते 2017 च्या दरम्यान इस्लामिक स्टेटला पराभूत केल्यानंतर इरामध्ये शेकडो संशयित जिहादींवर खटला चालवण्यात आला आणि अनेकदा सामूहिक पद्धतीने फाशी देण्यात आली. मानवाधिकार समूहाने इराकी आणि अन्य क्षेत्रीय दलांवर न्यायालयीन प्रक्रियेत विसंगती आणि खटल्यात कमतरतेचा आरोप केला आहे, परंतु इराकचे म्हणणे आहे की, त्यांचे खटले निष्पक्ष आहेत. इस्लामिक स्टेटने 2014 मध्ये एक तृतीयांश इराकवर कब्जा केला होता, परंतु तीन वर्षांदरम्यान त्यांना इराक आणि शेजारी देश सीरियामध्ये मोठ्या प्रमाणात पराभूत करण्यात आले होते.

विशेष म्हणजे, सीरिया आणि इराकमध्ये पाय कमजोर झाल्यानंतर दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट म्हणजे आयएसने आपल्या रणनीतीमध्ये बदल केला आहे. मागील दिवसात आलेल्या एएनआयच्या रिपोर्टनुसार, इस्लामिक स्टेट आता दक्षिण आशियामध्ये पाय जमवण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानमध्ये त्यास पूर्ण संरक्षणसुद्धा मिळत आहे. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या 45 व्या सत्रात इतर आयोजित वेबिनारमध्ये तज्ज्ञांनी अफगाणिस्तानच्या स्थितीला चिंताजनक मानले. तज्ज्ञांचे म्हणणे होते की, अफगाणिस्तानमध्ये तालिबानपासून वेगळे झालेले काही कमांडर आयएसमध्ये सामील होऊन योद्ध्यांची भरती करत आहेत.

मागील दिवसात संयुक्त राष्ट्राने आपल्या अंदाजात म्हटले होते की, सीरिया आणि इराकमध्ये 10 हजारांपेक्षा जास्त इस्लामिक स्टेटचे योद्धे सक्रिय आहेत आणि या वर्षीच्या हल्ल्यात मोठी वाढ झाली आहे. युद्धाच्या मैदानात इस्लामिक स्टेटच्या पराभवानंतरही या दहशतवादी संघटनेचे छोटे-छोटे सेल स्वतंत्ररूपात या दोन्ही देशात सक्रिय आहेत. इतकेच नव्हे, इस्लामिक स्टेट कट्टरतावाद्यांच्या समूहाची कक्षासुद्धा वाढत आहे. आयएसचे दहशतवादी आता सीरिया आणि इराकशिवाय दुसर्‍या देशांमध्येसुद्धा भयंकर हालचाली करत आहेत.