चीनविरूद्ध सौदी अरबची मोठी कारवाई, 184 चीनी वेबसाइट केल्या बंद; जाणून घ्या काय होते आरोप

रियाद : सौदी अरबने खराब, भेसळयुक्त वस्तू विकणे आणि बनावट ऑफर देण्याबाबत 184 चीनी वेबसाइट बंद केल्या आहेत. गल्फ न्यूजच्या रिपोर्टनुसार, या वेबसाइट सौदी अरबच्या बाजाराला निशाणा बनवत होत्या. अल जजीरा वृत्तपत्राने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, या वेबसाइट ग्राहकांना रिटर्न, एक्सचेंज आणि आफ्टर सेल्स सेवांचा पर्याय देण्यात अयशस्वी ठरल्या. त्यांनी गुणवत्तेच्या बाबतीत सुद्धा ग्राहकांची दिशाभूल केली. सौदी अरबच्या मंत्रालयाने या सर्व साइट ब्लॉक केल्या आहेत.

रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, या वेबसाइटवर ग्राहक सेवेसह स्टोअरचा पत्ता आणि संपर्क नंबर नोंदवलेला नाही. सौदी अरबच्या सरकारने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध जाहिरातीत लोकांना खरेदीसाठी विश्वसनीय स्टोअर्सची सेवाच घेण्यास सांगितले आहे. वृत्तसंस्था एएनआयने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, अधिकार्‍यांना जाणवले की, लोक अरबी भाषेत जारी जाहिरातीमुळे आकर्षित होत आहे. विशेष करून त्या जाहिरातींबाबत ज्या त्यांच्याशी संबंधीत आहेत.

अधिकार्‍यांनी जेव्हा अशी एक वेबसाइट ब्लॉक केली तेव्हा पाच अन्य वेबसाइट सुरू झाल्या ज्यांच्या माध्यमातून विक्री झाली. अधिकार्‍यांनी सांगितले की, 184 वेबसाइटला एकाच वेळी जास्तीत जास्त लोकांना आकर्षित करण्याच्या हेतूने लाँच केले होते. याच कारणामुळे त्या सर्व ब्लॉक कराव्या लागल्या. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, अत्तर, बॅग, चप्पल, कपडे आणि सौंदर्य प्रसाधन या वेबसाइटद्वारे विकले गेले. मंत्रालयाने तपास केल्यानंतर कारवाई केली.

पाकिस्तानमध्ये सुद्धा चीनला जोरदार झटका बसला आहे. पाकिस्तानच्या सरकारने चीनी अ‍ॅप टिकटॉकवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. पेशावर हायकोर्टच्या निर्णयानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. पाकिस्तानची नियामक संस्था पाकिस्तान टेलीकॉम अथॉरिटी (पीटीए) चे प्रवक्ता खुर्रम मेहरन यांनी सांगितले की, संस्था न्यायालयाच्या आदेशाचे पालन करेल. न्यायालयात याचिकेद्वारे विनंती करण्यात आली होती की, अ‍ॅपच्या माध्यमातून अश्लील सामुग्री दिली जात आहे.