MIM नेत्याच्या बंगल्यावर छापा, लहान भावासह 7 जण अटकेत

पोलिसनामा ऑनलाईन टीम – भिवंडी शहरातील एमआयएम शहर अध्यक्ष खालिद गुड्डू यांच्या बंगल्यावर मध्यरात्री खंडणी विरोधी आणि नार्को टेस्टच्या अधिकार्‍यानी छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी स्थानिक पोलिसांना बाहेर ठेवण्यात आले होते. छाप्यासाठी तब्बल 30 ते 35 पोलिसांच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.

छाप्यात खालिद गुड्डू यांच्या लहान भावासह सात जणांना स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खंडणी विरोधी आणि नार्को टेस्टच्या अधिकार्‍यानी केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत आज पोलिसांकडून खुलासा केला जाणार आहे. खालिद गुड्डू हे वादग्रस्त व्यक्तिमत्व असून याआधी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष होते. त्यानंतर ते एमआयएम मध्ये शहरराध्यक्ष बनले आहेत.

त्याच्यावर विविध गुन्हे दाखल असून काही निकाली निघाले आहेत. 10 वर्षांपूर्वी त्यांच्या भावाला दिल्ली पोलिसांनी अशाच पध्द्तीने अटक केली होती. गुड्डू यांनी विधानसभा निवडणूकही लढवली होती. त्यासाठी एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसीच्या भिवंडीत सभा झाल्या होत्या.