भारतीय नौदलाचं MiG-29K विमान अरबी समुद्रात कोसळलं

पोलीसनामा ऑनलाइन – गुरुवारी भारतीय नौदलाचं मिग-२९के विमान अरबी समुद्रात कोसळले . नौदलाचं प्रशिक्षक MiG-29K विमान दुर्घटनाग्रस्त झालं आहे. अरबी समुद्रावरुन उड्डाण करत असताना विमान दुर्घटनाग्रस्त झाले. दुर्घटनेची माहिती मिळताच सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले. याप्रकरणी सध्या चौकशीचे आदेश दिले आहेत. रेस्क्यू टीमने एका वैमानिकाला वाचवलं असून दुसऱ्या वैमानिकाचा शोध अद्याप सुरु आहे.

भारतीय नौदलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, “भारतीय नौदलाचं मिग-२९के प्रशिक्षक विमान २६ नोव्हेंबरला पाच वाजता दुर्घटनाग्रस्त झालं. एका वैमानिकाचा शोध लागला आहे, तर दुसऱ्या वैमानिकाचा हवाई तसंच समुद्रमार्गे शोध घेतला जात आहे. याप्रकरणी चौकशीचा आदेश देण्यात आला आहे.

दरम्यान, ८ मे २०२० रोजी पंजाबमधील नवाशहर येथे नौदलाचं लढाऊ विमान मिग-२९ तांत्रिक बिघाड झाल्याने दुर्घटनाग्रस्त झालं होतं. यावेळी वैमानिकाने पॅराशूटच्या सहाय्याने विमानातून उडी मारुन आपला जीव वाचवला होता. विमान एका शेतात दुर्घटनाग्रस्त झालं होतं, ज्यामुळे शेताला आग लागली होती. याआधीही मिग-२९ विमानं अनेकदा दुर्घटनाग्रस्त झाली आहेत. २३ फेब्रुवारी २०२० रोजी गोव्यात मिग-२९ दुर्घटनाग्रस्त झाले होते.. वैमानिक या दुर्घटनेतून सुखरुपपणे बाहेर पडला होता. सकाळी १० वाजता विमानाने प्रशिक्षणासाठी उड्डाण केले. मात्र काही वेळातच विमानात तांत्रिक बिघाड झाला याचदरम्यान विमान दुर्घटनाग्रस्त झाले . ज्याची माहिती एअर ट्राफिक कंट्रोलला देण्यात आली.