Migraine Pain | कडक उन्हाळ्यात मायग्रेनच्या त्रासाने असाल त्रस्त तर करा ‘हे’ खास उपाय, लवकर मिळेल आराम; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – उन्हाळ्यात तापमान वाढले की डोकेदुखीची समस्या (Headaches Problem) खूप त्रासदायक बनते. उन्हाळ्यात डोकेदुखीची अनेक कारणे आहेत जसे की डिहायड्रेशनमुळे होणारे दुखणे, पर्यावरण प्रदूषण, उष्माघात आणि मायग्रेन. उन्हाळ्यात मायग्रेनच्या वेदना (Migraine Pain) लोकांना खूप त्रास देतात. जर्नल न्यूरोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, उन्हाळ्यात डोकेदुखी जाणवण्याची शक्यता 8 टक्क्यांनी वाढू शकते. अभ्यासात म्हटले आहे की, हिवाळ्याऐवजी, उन्हाळ्याच्या हंगामात रक्तवाहिन्यांचा आकार बदलतो, ज्यामुळे तीव्र डोकेदुखी आणि मायग्रेनसारख्या समस्या (Migraine Pain) उद्भवू शकतात.

 

मायग्रेनचा त्रास डोक्याच्या एका बाजूला होत असेल तर सतत अनेक दिवस त्रास होतो. मायग्रेनमुळे, एखाद्या व्यक्तीला हार्मोन बदल, भावनिक ताण, प्रखर प्रकाश आणि आवाजाचा त्रास, झोप न लागणे आणि डिहायड्रेशन यासारख्या समस्या उद्भवू शकतात. जर तुम्हीही उन्हाळ्यात मायग्रेनच्या त्रासाने (Migraine Pain) त्रस्त असाल तर काही खास उपाय करून तुम्ही या त्रासापासून मुक्ती मिळवू शकता (Remedies For Migraine In Summer).

 

1. जेवण स्किप करू नका (Don’t Skip Meals) :
उन्हाळ्यात मायग्रेनचा त्रास होत असेल तर आहाराची विशेष काळजी घ्या. नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण वगळू नका. मसालेदार अन्न टाळा.

 

2. सिगारेट टाळा (Avoid Cigarettes) :
सिगारेट, चॉकलेट आणि अल्कोहोल यासारख्या गोष्टींचे सेवन टाळा. या गोष्टींमुळे शरीरात डिहायड्रेशन होऊन मायग्रेनचा त्रास वाढतो.

3. उन्हापासून दूर रहा (Stay Away From Sunlight) :
मायग्रेनच्या वेदनांचे सर्वात मोठे कारण म्हणजे सूर्यप्रकाश, तो टाळा. दिवसा घराबाहेर पडणे टाळा. उन्हात बाहेर पडल्यास डोळ्यांवर सनग्लासेस लावा. जर तुम्ही उन्हात बाहेर जात असाल तर स्वतःला झाकून घ्या.

 

4. शरीर हायड्रेट ठेवा (Keep Body Hydrated) :
उन्हाळ्यात डिहायड्रेशनची समस्या सामान्य आहे, ज्यामुळे उलट्या, चक्कर येणे, मळमळणे अशा समस्या उद्भवू शकतात.
डिहायड्रेशन टाळण्यासाठी, शरीर हायड्रेटेड ठेवा. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी लिंबू पाणी, नारळ पाणी आणि ग्लुकोजचे सेवन करा.

 

5. पुरेशी झोप घ्या (Get Enough Sleep) :
तज्ञांच्या मते, या दुखण्यापासून मुक्त होण्यासाठी पुरेशी झोप घ्या. रात्री 7-8 तासांची झोप आवश्यक आहे.
मायग्रेन असलेल्या लोकांना पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Migraine Pain | 5 ways you can get rid of migraine pain

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Parbhani News | धक्कादायक ! लग्नाच्या जेवणात तब्बल 100 जणांना विषबाधा

 

Digital Rape in Noida | अल्पवयीनावरील ’डिजिटल रेप’मध्ये 81 वर्षांच्या चित्रकाराला अटक, जाणून घ्या काय आहे डिजिटल रेप

 

Amruta Fadnavis on CM Uddhav Thackeray | अमृता फडणवीसांचा CM उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाल्या – ‘वजनदार ने हल्के को…’