Migraine | उलट्या आणि डोकेदुखी असू शकतात मायग्रेनची लक्षणे, जाणून घ्या कारणे आणि प्रतिबंधात्मक उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मानसिक आरोग्याशी (Mental Health) संबंधित अनेक समस्या आणि आजार आहेत. यापैकीच एक मायग्रेन (Migraine) आहे. डॉक्टर मार्क हायमन (Dr. Mark Hyman) यांच्या मते, मायग्रेन (Migraine) हा किरकोळ आजारासारखा वाटतो. परंतु हा किरकोळ आजार एक मोठी समस्या बनू शकतो, ज्यामुळे तीव्र डोकेदुखी होऊ शकते, जी अनेक दिवस टिकू शकते. मायग्रेनचे कारण केवळ मेंदूच नाही तर इतर कारणांमुळेही होऊ शकतो.

 

वेबएमडीनुसार, डोक्याच्या एका बाजूला तीव्र वेदना, उलट्या, मळमळ आणि डोक्यात मुंग्या येणे ही मायग्रेनची प्रमुख लक्षणे आहेत. यावर प्रतिबंधात्मक औषधांनी उपचार केला जातो. डॉ. मार्क हायमन यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर मायग्रेनची तीन सर्वात सामान्य कारणे शेअर केली आहेत.

 

मॅग्नेशियमची कमतरता
मॅग्नेशियम हे सामान्यपणे रिलॅक्सेशन मिनरल म्हणून ओळखले जाते. शरीरात त्याची कमतरता असेल तर डोकेदुखी आणि मायग्रेन होऊ शकतो. डॉक्टर मार्क यांनी मॅग्नेशियम ग्लायसीनेट, सायट्रेट, ऑक्साइड किंवा एस्पार्टेटचे डोस घेण्यास सांगितले आहे. (Migraine)

 

यामुळे मायग्रेनच्या लक्षणांपासून आराम मिळतो. डॉक्टर मार्क यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच या औषधांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला आहे. किडनीचा आजार असल्यास डॉक्टरांच्या देखरेखीखाली मायग्रेनवर उपचार करा.

असे पदार्थ ज्यामुळे त्रास होतो
काही पदार्थांमुळे काही लोकांना त्रास होतो. या स्थितीला फूड सेन्सिटिव्हीटी म्हणतात. मायग्रेन देखील अनेकदा ग्लूटेनमुळे होऊ शकतो. ग्लूटेन हे गहू, बार्ली, राई, ओट्स इत्यादींमध्ये आढळणारे एक प्रकारचे प्रोटीन आहे, जे पीठ बनवल्यावर सक्रिय होते. जर ग्लूटेनची समस्या असेल तर शरीरात सूज होऊ शकते.

 

हार्मोनचे असंतुलन
अनेक महिलांना मासिक पाळीपूर्वी मायग्रेनचा त्रास होतो. जे अनेकदा इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनमधील असंतुलनामुळे होते.
हायमन सांगातात की, हे जास्त प्रमाणात अल्कोहोल, साखर, मैदा आणि स्टार्च खाणे आणि तणावामुळे होऊ शकते.

 

पुरेसा व्यायाम आणि चांगली झोप मिळत नसेल तर असे होऊ शकते.
मायग्रेन टाळण्यासाठी आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करणे,
दारूचे सेवन कमी करणे आणि जंक फूडपासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Migraine | vomiting and headache can be symptoms of migraine know the causes and prevention

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Fish Oil Benefits | हिवाळ्यात हृदयरोगापासून डोळ्यांची दृष्टी वाढवण्यापर्यंत, ‘या’ 4 आरोग्य समस्यांमध्ये लाभदायक आहे माशाचे तेल; जाणून घ्या

MLA Girish Mahajan | ठाकरे शिंदेंच्या भेटीवर गिरीश महाजन म्हणाले -‘ राजकारणात केव्हाही काहीही…’

Cough-Cold And Sore Throat | खोकला-सर्दी आणि घशाच्या खवखवीने आहात त्रस्त तर अवलंबा हमदर्द का जोशीना