महाभयंकर अंधश्रध्देचा बाजार ! घरी परतण्यासाठी देवीसमोर कापली स्वतःचीच ‘जीभ’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे देशभरात लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे विविध कामगार परराज्यात अडकले आहेत. त्यांच्याकडून घरी जाण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मध्य प्रदेशमधून कामानिमित्त गुजरातमध्ये आलेल्या एका शिल्पकाराने अंधश्रद्धेपोटी घरी जाण्यासाठी देवीच्या मंदिरात त्याची जीभ कापली आहे. विवेक शर्मा असे त्याचे नाव असून तो मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यातील आहे.

कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे तरूणाला घरी जाण्याची इच्छा होती. कोरोना व्हायरस निघून जावा याकरता या तरूणाने देवीसमोर त्याग करण्यासाठी त्याने जीभ कापून घेतली. शनिवारी हा तरूण सुईगाम तालुक्यातील नादेश्वरी गावातील नादेश्वरी देवीच्या मंदिरात बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. पोलीस उपनिरीक्षक एचडी परमार यांनी दिलेल्या माहितीनुसार तो जीभ हातमध्ये पकडून बेशुद्ध अवस्थेत त्यांना आढळून आला. त्याला त्वरीत सुईगाममधील रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले.

ज्या देवळात ही घटना घडली त्या देवळाची सुरक्षा ’बीएसएफ’च्या हातामध्ये होती. त्या मंदिरापासून 14 किलोमीटर दूर असणार्‍या एका मंदिरात विवेक काम करायचा. लॉकडाऊनमुळे त्याचे काम तर थांबलच पण तिथेच अडकून होता. परिणामी घरच्या आठवणीने तो व्याकुळ झाला होता. बीएसएफच्या स्थानिक अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार त्याने देवीसमोर काहीतरी त्याग करण्यासाठी स्वत:ची जीभ कापून घेतली, जेणेकरून कोरोनाचे हे संकट दूर होईल. मात्र पोलिसांनी यावर बोलण्यास नकार दिला आहे.