Coronavirus Lockdown : ‘लॉकडाऊन’मध्ये दिल्लीतून पायी निघाला होता घराकडं, 200 किमी चालल्यानंतर युवकाचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी देशात २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली गेली असताना पायी घरी जाणाऱ्या एका तरुणाचा रस्त्यातच मृत्यू झाला आहे. रणवीर सखवार मध्य प्रदेशच्या मुरैनाचा राहणारा होता. तो दिल्लीत एका हॉटलमध्ये डिलिव्हरी पोचवण्याचे काम करत होता. दलित तरुण रणवीरचा मृत्यू पायी चालत जात असताना हार्टअटॅकने झाला आहे.

दिल्लीत पासून तब्बल २०० किमी नंतर शनिवारी रणवीर आग्राला पोचला होता. आग्रा पोलीस ठाण्याच्या सिकंदर क्षेत्रात रणवीरच्या छातीत दुखू लागले. नंतर त्याचा मृत्यू झाला. तो आपल्या कुटुंबाचा एकमेव आधार होता.

लॉकडाऊन घोषित केल्यानंतर त्याला हॉटेलमधून सुट्टी दिली गेली होती. लॉकडाऊनमुळे कोणतीही गाडी न मिळाल्याने रणवीर पायी चालत आपल्या घरी जाण्यासाठी निघाला. काही लोकं सोबत होती, पण नंतर गर्दीत ते वेगळे झाले. रणवीर ऑक्टोबर महिन्यात कुटुंबाला राहण्यासाठी गावात घर बनवून दिल्लीला परतला होता. रणवीरच्या पत्नीला यावेळी घरी येण्याची माहिती दिली होती. बहीण पिंकीलाही सांगितले होते कि तो लवकरच घरी येणार आहे.

रणवीरच्या मृत्यूनंतर एसडीएम अम्बाह यांची परवानगी घेऊन कुटुंब आग्राला पोचले. तर जिल्हा प्रशासनाकडून रणवीरच्या कुटुंबाला ५ हजार रुपये रक्कम अंत्य संस्करासाठी दिली गेली आहे. नियमानुसार, शासनाकडून दोन लाख रुपयाची मदत ताबडतोब दिली जाईल.