Coronavirus Lockdown : दिल्लीच्या ‘आनंद विहार’ बस स्थानकावर उडाली लोकांची ‘झुंबड’, प्रत्येकाला आपल्या शहर-गावाकडे जाण्याची ‘इच्छा’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या चौथ्या दिवशी देशभरातील मजुरांचे स्थलांतर करणे हे एक मोठे आव्हान बनून समोर येत आहे, याचा मोठा नजारा दिल्लीच्या आनंद बिहार बस स्थानकात दिसला, येथे शनिवारी संध्याकाळी लोकांची झुंबड दिसून आली. दिल्लीहून लोक उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि इतर राज्यात जात आहेत.

तसेही आधीच मोठ्या प्रमाणात लोक पायीच आपल्या गावी व शहराकडे जाण्यास निघाले आहेत, तथापि, शनिवारी बस चालू करण्याच्या सूचनेवरून उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडला जाणाऱ्या लोकांनी आनंद विहार आणि कौशांबी बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. या सर्व लोकांना कुठल्याही परिस्थितीत त्यांचे शहर-गाव गाठायचे आहे, रस्त्यावर उतरलेल्या या लोकांना या वेळी ना कोरोना विषाणूची भीती आहे आणि ना सोशल डिस्टेंसिंगची, त्यांना फक्त घरी पोहोचायचे आहे.

दिल्लीच्या आनंद विहार बस टर्मिनलममध्ये मोठ्या संख्येने कामगार आपापल्या शहरांकडे आणि गावाकडे जाणाऱ्या बसेसची वाट पहात आहेत. त्यांना आशा आहे की ते कोणत्याही परिस्थितीत आपल्या घरी पोहोचतील. असे सांगितले जात आहे की सर्व लोकांची थर्मल स्क्रीनिंग करण्यात आली होती, त्यामुळे आनंद विहार बसस्थानक ते कौशांबी बसस्थानकापर्यंत खूप लांब लाईन लावण्यात आली होती.

आनंद विहारमध्ये हजारो प्रवासी जमले आहेत. बसस्थानकात जास्तीची गर्दी कमी करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी अनेक स्टॉपओव्हर पॉईंट तयार केले आहेत. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तिथेच राहण्यास सांगितले आहे.