‘रिंग रोड’ प्रकल्प स्थलांतरीत करु ! एकही घर बाधित होणार नाही : राहुल कलाटेंची रिंगरोड बाधितांना ग्वाही

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात बीआरटी प्रकल्पाचा बोजवारा उडाला असताना कायबाह्य ठरलेला ‘रिंग रोड’ चिंचवडकरांच्या माथी मारला जात आहे. हजारो नागरिकांचा त्यास विरोध असताना सत्तेच्या जोरावर हा प्रकल्प रेटून नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. साडेतीन हजार घरे यामध्ये बाधित होत आहेत. परंतु, आपण रिंगरोड बाधितांना न्याय देण्यास कटीबद्ध असून आपण हा प्रकल्प स्थलांतरीत करु, एकही घर बाधित होवू देणार नाही, अशी ग्वाही चिंचवड विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी आज ‘रिंग रोड’ बाधितांना दिली.

‘रिंग रोड’ आरक्षणात वाल्हेकरवाडी, थेरगाव, काळेवाडी, पिंपळे गुरव, कासारवाडी, नवी सांगवी भागातील जवळपास तीन ते साडेतीन हजारांपेक्षा अधिक घरे बाधीत ठरली आहे. रिंग रोड’साठी ही घरे हटविण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यावर पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण प्रशासन कारवाई करत आहे. या प्रकल्पाला सुरूवातीपासून विरोध होत असून बाधितांनी विविध मार्गाने आंदोलन छेडले आहे.

राहुल कलाटे पुढे म्हणाले की, ‘रिंग रोड’विरोधातील आंदोलन दडपण्यासाठी आंदोलकांमध्ये फुट पाडण्याचे कारस्थान करण्यात आले. परंतु, आपण हे खपवून घेणार नाही. वास्तविकतः सद्यस्थितीत ‘रिंग रोड’ कालबाह्य झाला आहे. जनतेने आपल्याला एक संधी दिल्यास ‘रिंग रोड’ आपण स्थलांतरीत करुन दाखवू, व रिंगरोड बाधितांना न्याय देऊ, असा विश्वास कलाटे यांनी व्यक्त केला.

संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा
चिंचवड विधानसभा मतदार संघातील सर्वपक्षीय उमेदवार राहुल कलाटे यांना मराठा सेवा संघ संभाजी बिग्रेडच्या वतीने आज (सोमवारी) पाठिंबा देण्यात आला. तसेच नागरी हक्क सुरक्षा समितीचे मानव कांबळे यांनीही कलाटे यांना पाठींबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे आणि वंचित बहुजन आघाडीपाठोपाठ आता मराठा सेवा संघ संभाजी बिग्रेड, नागरी हक्क सुरक्षा समितीचेही पाठबळ मिळाल्याने कलाटे यांचे पारडे जड झाले आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी