पुणे : हिंजवडीतून ५६ कंपन्यांनी स्थलांतर केल्याची चर्चा

पुणे :पोलीसनामा ऑनलाईन

वारंवार होणारी वाहतूक कोंडी व सुविधांचा अभाव यामुळे हिंजवाडीतून ५६ कंपन्यांनी स्थलांतर केल्याच्या वृत्तामुळं आय टी क्षेत्रात गोंधळाचे वातावरण बघायला मिळत होते. मात्र या बातमीचा हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशन संस्थेने स्पष्ट इन्कार केला आहे. सध्या कोणतीही आयटी कंपनी स्थलांतर करत नसल्याचं असोसिएशन म्हंटल आहे.

वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या पाच ते सहा बहुराष्ट्रीय कंपन्यांनी हिंजवडी पार्कमधून स्थलांतर केलं आहे. तर पन्नासच्या आसपास लहान कंपन्यांनी वाकड, बाणेर, बालेवाडी आणि पुण्यालगतच्या अन्य भागात स्थलांतर केलं आहे. या बातमीमुळे पुण्यातील आयटी पार्कमध्ये खळबळ निर्माण झाली होती . हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशनने हे वृत्त नाकारलं आहे.

लवासा दिवाळखोरीच्या वाटेवर, लवादासमोर सुनावणी

मिळालेल्या माहितीनुसार, हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशन संस्थेचे अध्यक्ष अनिल पटवर्धन म्हणाले की,”आमच्याकडे सुमारे ८८ हुन अधिक कंपन्या सभासद आहेत अनेक कंपन्यांचे येथे प्रोजेक्ट सूरु आहेत आमच्या तरी ऐकिवात असे काहीही नाही आणि तसे काही झालेही नाही मात्र आयटी कंपन्या व्यतीरिक्त एखादी फर्मास्युटिकल आणि इंजिनेअरिंग कंपनी स्थलांतरीत होत असेल तर सांगता येत नाही. मात्र आमच्या आयटी कंपन्यापैकी तरी कोणी स्थलांतरित होण्याच्या मानसिकतेत नाही.” वाहतूक कोंडींमुळं आयटी कंपन्या स्थलांतरनाच वृत्त जरी नाकारण्यात आलं असलं तरी वाहतूक कोंडी ही समस्या पुणेकरांसाठी नित्याचीच झाली आहे.

वाहतूक कोंडी नित्याचीच

“वाहतूक कोंडी हा मुद्दा शासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी गांभीर्याने घेत नसल्यामुळे अनेक प्रश्न वाढीस लागले आहेत . पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरेशी सक्षम नसल्याने नागरिक खाजगी वाहनाने प्रवास करणं पसंत करतात . अपुरी व ढिसाळ नियोजन असलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ,वाहनांची वाढलेली संख्या व बेशिस्त वाहतूक यामुळं वाहतूक कोंडीचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी समस्येचं गांभीर्य ओळखून वेळीच उपाय योजना सुरु केल्या पाहिजेत अन्यथा विद्येचे माहेरघर ,प्रमुख आयटी हब असलेल्या शहराची वाहतूक कोंडीचे शहर हीच ओळख होऊन जाईल.”

[amazon_link asins=’B019FGRA2U,B075JC1RC2′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a2db7c39-adbc-11e8-8f22-fbac10da726b’]