जेंव्हा खुलेआम मिकाने राखी सावंतला केले KISS…

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – मीका सिंह आणि राखी सावंतचा किसवाला व्हिडीओ व्हायरल. हा व्हिडीओ खूप जुना आहे. हा व्हिडीओ २००६ चा आहे. त्यादिवशी मिका सिंहचा वाढदिवस होता. मिकाने केक कट करतांना अचानक राखीला किस केले आणि राखीला राग आला.

त्यानंतर राखीने मिका वर जबरदस्ती किस करण्याचा आरोप लावला. या गोष्टीवर मिकाने एका मुलाखतीत सांगितले की, ” मी मुंबईच्या अंधेरी मधील एका पब मध्ये माझी बर्थडे पार्टी ठेवली होती. मी या पार्टी मध्ये काही लोकांनाचबोलावलं होतं, या मध्ये प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आशिष शेरवुड देखील समाविष्ट होते. मी राखीला बोलावलं नव्हतं कारण तिचं वागणं मला माहिती होत.

ती आशिष सोबत आली होती आणि ती माझ्यासोबत खूप फ्रेंडली वागत होती परंतु, मला काही फरक पडत नाही. मी पार्टी एन्जॉय करत होतो. मिकाने सांगितले की ‘सगळं काही व्यवस्तीत चालू होतं. राखी सावंत सुद्धा पार्टी एन्जॉय करत होती परंतु, वातावरण तेंव्हा तापले जेंव्हा राखीने माझ्या चेहऱ्यावर केक लावण्याचा प्रयत्न केला.

मला स्किनची अलर्जी आहे. मी सगळ्यांना सांगितलं होता की मला कोणी केक लावू नका, परंतु तिने तरीसुद्धा माझ्या चेहऱ्यावर जबरदस्ती केक लावत होती. त्यामुळे मला राग आला आणि मी तिला सगळ्यांसमोर किस केले. यानंतर राखीने भलताच राडा घातला. पण अजूनही हा व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडतो. अजूनही तो व्हिडीओ शेयर करतांना दिसतो आहे.