कंगनाच्या विधानावर ‘सिंगर’ मिका सिंगची नाराजी ! म्हणाला – ‘तुझी लाज वाटते’

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस कंगना रणौत (Kangana Ranaut) हिनं अलीकडेच शेतकरी आंदोलनावर भाष्य केलं. कंगना म्हणाली होती की, शेतकऱ्यांच्या नावाखाली प्रत्येकजण आपापली पोळी भाजून घेत आहे. याआधीही कंगनानं शेतकरी आंदोलनातील एका वृद्ध महिलेची तुलना दिल्लीतील शाहीन बाग आंदोलनात सहभागी होणाऱ्या 90 वर्षीय बिलकीस दादी सोबत केली होती. यानंतर ती ट्रोल झाली आणि तिनं ते ट्विट डिलीट केलं होतं. कंगनानं असा दावा केला होता की, हे 100 रुपयांसाठी प्रत्येक आंदोलनात सहभागी होत असतात. यानंतर अनेक पंजाबी सेलेब्सनं तिच्यावर टीका केली. अ‍ॅक्टर आणि सिंगर दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) यानंही ट्विट करत कंगनावर निशाणा साधला होता. याला कंगनानंदेखील उत्तर दिलं होतं. कंगनानं दिलजीतला करण जोहरचा पाळीव म्हणन संबोधलं होतं. आता बॉलिवूड आणि पंजाबी सिंगर मिका सिंग (Mika Singh) यानंही एक पोस्ट शेअर करत कंगनावर नाराजी व्यक्त केली आहे.

‘तुझी लाज वाटते’

मिकानं त्याच्या ट्विटरवरून वृद्ध आजीचा फोटो शेअर करत लिहिलं की, माझ्या मनात कंगना रणौतसाठी खूप सन्मान होता. तिच्या ऑफिसची तोडफोड झाली होती तेव्हा मी तिचं समर्थन केलं होतं. परंतु मला वाटतं की, मी चुकीचा होतो. एक महिला म्हणून कंगनानं वृद्ध महिलेचा सन्मान करायला हवा. जर तुझ्यात थोडाही शिष्टाचार असेल तर माफी माग. तुझी लाज वाटते.

मिकाची ही पोस्ट समोर आल्यानंतर अनेक लोक कंगनाच्या विरोधात उभे आहेत. अनेक सेलेब्सही पंजाबी सिंगर दिलजीतची बाजू घेताना दिसत आहेत.

You might also like